बिझनेस आयडिया
नवी दिल्ली, 24 जून : देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वाटतं की, ते फक्त धान्य म्हणजेच गहू सारखी पारंपारिक शेती करुनच चांगली कमाई करु शकतात. मात्र सुगंधित फूल आणि जडी-बुटीची शेती करुनही मोठी कमाई होऊ शकते. यामध्ये सुगंधिक रोप जिरेनियम (Geranium)चाही समावेश होते. ज्याची शेती करुन शेतकरी बंपर फायदा मिळवू शकतो. याच्या रोपापासून तेल काढण्याचं काम केलं जातं. या रोपाच्या तेलाची बाजारात खूप मागणी आहे. यामुळे तुमचा चांगला बिझनेस होऊ शकतो. 20,000 रुपये लिटरला विकले जाणारे हे तेल जिरेनियमच्या फुलांपासून काढले जाते. औषधी, साबण, परफ्यूम आणि सौंदर्य उत्पादने त्याच्या तेलापासून बनवली जातात. पूर्वी त्याचे पीक परदेशात घेतले जात असे. आता भारतातही होत आहे. जिरेनियमला गरीबांचा गुलाब असेही म्हणतात कारण त्याचा सुगंद गुलाबासारखा असतो. डॉक्टर पिता-पुत्र झाले आधुनिक शेतकरी, लाखोंची आहे कमाई; सरकारनेही केलं तोंडभरून कौतुक कधीही करु शकता जिरेनियमची शेती जिरेनियमचं रोप कुठेही उगवता येऊ शकतं. मात्र बलुई दोमट माती यासाठी चांगली मानली जाते. या झाडांना खूप कमी पाणी लागते. कमी पाऊस पडेल अशा ठिकाणी लागवड करता येते. त्याच्या लागवडीसाठी सर्व प्रकारचे हवामान चांगले मानले जाते. कमी आर्द्रता असलेले सौम्य हवामान त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. त्याची लागवड करून शेतकरी कमी पैशात सहज नफा वाढवू शकतात. Business Ideas : आयटीचा जॉब सोडून दाम्पत्याने निवडला शेती व्यवसाय, आज ‘या’ शेंगांची पावडर विकून करताय लाखोंची कमाई! पीक लागवडीसाठी एक लाख रुपये खर्च जिरेनियमचं पीक लावण्यासाठी 1 लाख रुपयांचा खर्च येतो . त्याचे तेल खूप महाग विकले जाते. त्याची बाजारात सुमारे 20 हजार रुपये प्रतिलिटर विक्री होते. त्याची झाडे 4 ते 5 वर्षे उत्पादन देतात. अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकता.