JOIN US
मराठी बातम्या / मनी / Facebook च्या 12 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

Facebook च्या 12 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी १२ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी सुरू आहे.

जाहिरात

Facebook अन् Instagram तुमच्यावर लक्ष ठेवतात? संपूर्ण सत्य काय आहे, वाचा सविस्तर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : जागतिक पातळीवर मंदीचं संकट दिसून येत आहे. त्याचे परिणाम आता हळूहळू सगळ्या क्षेत्रात दिसत आहेत. US टेक दिग्गज कंपनी फेसबुक आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहेत. साधारण 12 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी १२ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी सुरू आहे. जाहिरातीतून मिळणारे पैसे कमी झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कमाई झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतर गुगलने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी कपात केली. यासोबतच गुगलमध्ये नवीन भरतीची प्रक्रियाही थांबवली आहे. व्यवस्थापनाने कमकुवत कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे मागवली बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, मार्क झुकरबर्गने कर्मचाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांची कपात करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी व्यवस्थापनाने सर्व टीम लीडर्सना त्यांच्या टीममधील किमान 15 टक्के कर्मचाऱ्यांची नावे देण्यास सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार लिस्टमध्ये नावं देण्यासाठी टीम लीडर्सना ३० दिवसांची मुदत दिली आहे. ज्यांची कामगिरी चांगली राहिली नाही त्यांना काढण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. त्यामुळे १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. यापूर्वी वॉल स्ट्रीट जनरलनेही एका अहवालात म्हटले आहे की मेटा काही महिन्यांत किमान 10 टक्के खर्च कमी करणार आहे. यासाठी कंपनी सर्व विभागांमध्ये पुनर्गठन करण्याचा विचार करत आहे जेणेकरून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या