JOIN US
मराठी बातम्या / मनी / रिझर्व्ह बँकेची 5 बँकांवर मोठी कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला

रिझर्व्ह बँकेची 5 बँकांवर मोठी कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला

बंगळुरू येथील कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हाऊसिंग फायनान्सशी संबंधित बँकिंग तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बँक दोषी आढळली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. आरबीआयने दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बंगळुरू येथील कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हाऊसिंग फायनान्सशी संबंधित बँकिंग तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बँक दोषी आढळली आहे. याशिवाय, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या हिताची काळजी न घेतल्याबद्दल ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. HDFC बँक ग्राहकांची अनेक कामं एका SMSवर होणार; मोबाईलवर बँकेच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल? आरबीआयने झाशी येथील राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर 5 लाख रुपये, तामिळनाडूच्या तंजोर येथील निकोल्सन को-ऑपरेटिव्ह टाऊन बँकेवर 2 लाख रुपये आणि राउरकेला येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर 10,000 रुपये दंड ठोठावला.

टायपिंग मिस्टेक समोर येताच या शेयरमध्ये उसळी; एका दिवसात 20 टक्क्यांची तेजी

संबंधित बातम्या

बँकिंग नियामकाच्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे या सहकारी बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. यापूर्वी, RBI ने नियमांचे पालन न केल्याबद्दल आठ सहकारी बँकांवर दंड ठोठावला होता. या विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या