JOIN US
मराठी बातम्या / मनी / ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यापूर्वी चेक करा या गोष्टी, अन्यथा सापडाल अडचणीत

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यापूर्वी चेक करा या गोष्टी, अन्यथा सापडाल अडचणीत

ITR Filing: तुम्ही पहिल्यांदा आयकर रिटर्न भरणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

जाहिरात

आयटीआर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशात आयकर रिटर्न भरण्याचा सीजन सुरू होतो. आयटीआर दाखल करणे हे एक टेक्निकल प्रकरण आहे. ज्यामध्ये थोडीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. आयटीआर नोटीस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुपूर्द केली जाऊ शकते. तुम्हीही नोकरी करत असाल आणि आर्थिक वर्ष 2022-23 आणि असेसमेंट ईयर 2023-24 साठी आयकर रिटर्न भरणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. यामुळे आयटीआर फाइल करणे सोपे जाते आणि नंतर कोणतीही अडचण येत नाही.

ITR भरण्यापूर्वी या गोष्टींची करा तयारी

तुम्ही पहिल्यांदा ITR भरणार असाल तर सर्वात आधी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत ठेवा. यानंतर, पहिले आयकर वेबसाइटच्या अधिकृत वेबसाइट https://eportal.incometax.gov.in ला भेट द्या. पहिल्यांदाच आयटीआर दाखल करणाऱ्यांनी प्रथम त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा. लक्षात ठेवा पॅन नंबर हा युजर आयडी असेल आणि पासवर्ड तुम्ही तयार करू शकता.

पासवर्ड विसरल्यास काय करायचं?

अनेकदा लोक यूजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करतात. पण नंतर पासवर्ड विसरतात. अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही. Forget Password चा ऑप्शन निवडा. यानंतर, तुम्ही ज्या नंबरशी लिंक केले आहे, तिथे एक OTP येईल जो तुम्हाला येथे फिल करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नंबर तुमच्या आधारशी लिंक असला पाहिजे. यासोबतच पॅन आणि आधार देखील एकमेकांशी लिंक करणे आवश्यक आहे. यानंतर पुन्हा नवीन पासवर्ड तयार करा.

ITR Filing: टॅक्स देण्याएवढी कमाई नाही तरीही फाइल करा आयटीआर, मिळतील अनेक फायदे!

संबंधित बातम्या

AIS चेक करणे गरजेचे

आयटीआर भरण्यापूर्वी, टॅक्सपेयर्सला AIS (Annual Information Statement) तपासणे फार महत्वाचे आहे. वार्षिक माहिती रिपोर्टद्वारे, तुम्हाला तुमच्या संपूर्ण कमाईचे डिटेल्स मिळतील. हे पाहण्यासाठी, आयकरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि AIS निवडा. यानंतर, पार्ट वनमध्ये, तुम्हाला नाव, पॅन, आधार सारखी माहिती दिसेल. तर दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला कमाई, टीडीएस, अॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट, डिमांड यासारखी संपूर्ण माहिती मिळेल. यानंतर, ते तपासल्यानंतरही तुम्ही टॅक्स रिटर्न फाइल करा. यानंतर कोणत्याच प्रकारची चूक होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या