वाइन शॉप
मुंबई : वर्षाच्या अखेरीस आणि नव्या वर्षाचं स्वागत जोरदार झालं आहे. याचं कारण म्हणजे तळीरामांनी राज्याचा महसूलात चांगलीच वाढ केली आहे. तळीरामांमुळे राज्याच्या महसूलात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. विदेशी मद्यावर उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात याची मागणी वाढल्याचं पाहायला मिळालं. याचा फायदा राज्याच्या महसूलावर झाल्याचं समोर आलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मात्र यावेळी कमी महसूल मिळाला असला तरी राज्य सरकारने लक्ष्य २२ हजार कोटीचं ठेवलं आहे. गेल्या वर्षा 17 हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला होता. यंदा हाच महसूल 14 हजार कोटींहून अधिक मिळाला आहे. आता 22 हजार कोटींचा महसूल मिळवण्याचं टार्गेट राज्य सरकारचं आहे.
देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव; गाठला गेल्या 16 महिन्यांतील उच्चांक; आकडेवारी बघून तुम्हालाही बसेल धक्काबिअअर आणि वाईनची मागणी वाढल्यामुळे सरकारला जास्त महसूल मिळत आहे. गेल्यावर्षी सुरुवातीच्या 9 महिन्यांच्या तुलनेत यंदा 2 कोटी लीटर बिअरची जास्त विक्री झाली. यावर्षी 23 कोटी लीटर बिअर विकल्या गेल्या. वाइनच्या मागणीतही वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. तळीरामांमुळे मागच्या 9 महिन्यांचा एकूण आढावा घेऊन आकडेवारी काढली तर राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 14 हजार 480 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने मागणी वाढल्याची चर्चा आहे.
दुप्पट रकमेचे आमिष देवून 39 लाखांची फसवणूक, भंडाऱ्यातील धक्कादायक घटनाकोरोनामुळे मद्यविक्रीला मोठा फटका बसला होता. त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावरही झाला होता. आता कोरोनानंतर स्थिती पूर्ववत झाली आहे. त्यामुळे परदेशी मद्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.