JOIN US
मराठी बातम्या / मनी / या दिवशी बँक कर्मचारी करणार संप, बँकिंग आणि एटीएम सेवांवर प्रभाव पडण्याची शक्यता

या दिवशी बँक कर्मचारी करणार संप, बँकिंग आणि एटीएम सेवांवर प्रभाव पडण्याची शक्यता

संपाच्या दिवशी बँकेच्या शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत असल्याचे बँकेने म्हटले आहे. मात्र, संप झाल्यास त्या दिवशी बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : जर शनिवारी 19 नोव्हेंबरला तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते आधीच पूर्ण करा, कारण या दिवशी देशभरातील बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. 19 नोव्हेंबरला देशभरातील बँकांमध्ये संप होऊ शकतो. ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने (AIBEA) 19 नोव्हेंबरला एक दिवसीय संप पुकारला आहे. बँक ऑफ बडोदाने माहिती दिली - संपामुळे एटीएमसह सर्व बँकिंग सेवांवर या दिवशी परिणाम होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) ने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरींनी इंडियन बँक्स असोसिएशनला संपाची नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, AIBEA च्या सदस्यांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपावर जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. बँक कामकाज चालू ठेवण्यासाठी - संपाच्या दिवशी बँकेच्या शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत असल्याचे बँकेने म्हटले आहे. मात्र, संप झाल्यास त्या दिवशी बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात. बँकर्सवर हल्ले वाढले - ऑक्टोबरच्या सुरुवातीला, एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी एका निवेदनात म्हटले होते, “युनियनमध्ये कार्यरत बँकर्सच्या छळाच्या निषेधार्थ युनियनचे सदस्य संपावर जातील. ते म्हणाले होते, “अलीकडे अशा बँकर्सवरील हल्ले वाढले आहेतच पण त्यांच्याविरोधात उचलल्या जाणाऱ्या सर्व पावलांमध्ये साम्य आहे. या हल्ल्यांचा कट आहे. त्यामुळे आम्हाला AIBEA च्या पातळीवर या हल्ल्यांचा प्रतिकार आणि विरोध करावा लागेल.” वेंकटचलम यांनी दावा केला आहे की AIBEA युनियनच्या सदस्य बँकर्सना अलीकडेच सोनाली बँक, MUFG बँक, फेडरल बँक आणि स्टँडर्ड चार्टर्डसह अनेक बँकांमधून काढून टाकण्यात आले. ते म्हणाले की, 3,300 हून अधिक लिपिक कर्मचाऱ्यांची एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकात बदली करण्यात आली आहे, तसेच हे द्विपक्षीय करार आणि बँक स्तरावरील कराराचे उल्लंघन आहे. हेही वाचा -  Money Mantra - नोकरी असो वा बिझनेस; आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीत आज काय पाहा राशिभविष्य आरोप काय - दरम्यान, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनने (AIBOC) विदेशी बँक स्टँडर्ड चार्टर्डवर मानव संसाधन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला आहे. यासोबतच त्यांनी सविस्तर निवेदन देताना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याप्रकरणी तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे आवाहनही केले आहे. अनेक वेळा विनंती करुनही बँक असोसिएशन ऑफ स्टँडर्ड चार्टर्ड बँक ऑफिसर्स (कोलकाता) ची मान्यता देण्यास विलंब करत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या