bank strike
मुंबई : तुमची बँकेशी संबंधित कामं असतील तर ती तुम्ही आताच उरकून घ्या. याचं कारण म्हणजे 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याअखेरीस चार दिवस बँक बंद असणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे यांच्या मते, दोनवेळा चर्चा करूनही अजूनही काही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) कोणताही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) या महिन्यात दोन दिवसांचा बँक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.३० आणि ३१ जानेवारी रोजी बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच 28-29 बँक शेवटचा शनिवार, रविवार असल्याने बंद असणार आहेत. त्यानंतर पुढचे दोन दिवस संप करणार असल्याने बँका बंद राहणार आहेत. काय आहेत मागण्या? पहिली मागणी तर पाच दिवसांचा आठवडा करण्याची आहे. याशिवाय मागील सेवानिवृत्तांना पेन्शन सुरू करावी, चांगल्या सेवेसाठी सर्व श्रेणींमध्ये पुरेशी भरती करावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, वेतनवाढीच्या मागण्यांवर वाटाघाटी सुरू कराव्यात, अशा मागण्या बँक संघटनांकडून करण्यात येत आहेत. या मागण्यांना बँक असोसिएशनकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये बँक युनियन आणि युनियन यांच्यात झालेल्या वेतन सुधारणा कराराची आणि इतर मुद्द्यांवर मनासारखा तोडगा निघाला नाही. 27 जून 2022 रोजी संप पुकारण्यात आला होता. चर्चेच्या दोन फेऱ्यांनंतरही हे मुद्दे कायम आहेत. त्यामुळे संप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही असं मत व्यक्त केलं आहे.
या कालावधीमध्ये तुम्हाला ATM मध्ये खडखडात जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच पैसे काढून ठेवा. या कालावधीत इंटरनेट बँकिंग सेवा 24 तास उपलब्ध असल्याने छोटी कामं इंटरनेट बँकिंगद्वारे केली जाऊ शकतात.