JOIN US
मराठी बातम्या / मनी / ... म्हणून सलग 4 दिवस आहेत बँका बंद

... म्हणून सलग 4 दिवस आहेत बँका बंद

Bank, Strike - बँकांना लागोपाठ 4 दिवस सुट्ट्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर : केंद्र सरकार 10 बँकांचं विलीनीकरण करणार आहे. त्याविरोधात बँक अधिकाऱ्यांनी संपांचं हत्यार उपसलं आहे. 26 आणि 27 सप्टेंबरला हा संप पुकारण्यात आलाय. त्यानंतर लगेच चौथा शनिवार ( 28 सप्टेंबर ) आणि रविवार ( 29 सप्टेंबर ) आलेत. त्यामुळे चार दिवस बँका बंद असतील. बँकेशी संबंधित काही कामं असतील तर ती 25 सप्टेंबरपर्यंत उरकावी लागतील. देशाची तिसरी मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB ) . या बँकेत लवकरच तीन छोट्या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. या बँका आहेत ओरियंटल बँक ऑफ काॅमर्स ( OBC ), आंध्र बँक ( Andhra Bank ) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank ) यांचा समावेश आहे. LIC मध्ये नोकरीची मोठी संधी, 8500 जागांवर होणार भरती या आधी बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँक यांचं विलीनीकरण झालं होतं. विजया बँक आणि देना बँकच्या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा देशातली सर्वात मोठी सरकारी बँक बनली. पुढच्या पंधरवड्यात येणार वाईट बातमी; पेट्रोल -डिझेलचे भाव ‘इतके’ वाढणार केंद्र सरकारनं देशातल्या 10 बँकांचं विलीनीकरण करून चार मोठ्या बँका विलीन करण्याचा निर्णय घेतलाय.या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या संपाला सर्व संघटनांचा पाठिंबा आहे. तुमच्या क्रेडिट कार्डावर मिळणाऱ्या ‘या’ 5 सुविधा तुम्हाला माहीत आहेत का? काय आहेत मागण्या? बँकांचं विलीनीकरण होऊ नये, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी,आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावं, बँकांमध्ये नोकरभरती करावी, एनपीएस रद्द करावा, ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी, वेतन आणि पगारात बदल करावेत. VIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या