बजाज फायनान्समध्ये 12 महिन्यांपासून 60 महिने अर्थात 5 वर्षांसाठीही एफडी करता येऊ शकते. बजाज फायनान्सच्या एफडीमध्ये, गुंतवणूकदार कमीत-कमी 25000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
नवी दिल्ली, 15 एप्रिल : सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) कठीण काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विशेष मुदत ठेव योजनेची (Fixed Deposit Scheme) अंतिम मुदत (Deadline) वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना या उच्च व्याजदराच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अधिक कालावधी मिळणार आहे. स्टेट बँक (SBI), एचडीएफसी (HDFC),आयसीआयसीआय (ICICI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) या बँकांनी गेल्या वर्षी मे महिन्यात (May 2020) ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास मुदत ठेव योजना दाखल केली होती. या पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठीच्या विशेष मुदत ठेव योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षाही अर्धा टक्का अधिक व्याजदर देण्यात आलं. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य ग्राहकांसाठी असलेल्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक व्याजदर देण्यात आलं. हे वाचा - GOOD NEWS! तुमचा पगार 10% टक्के वाढणार; लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मात्र अशा या लाभदायी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्चपर्यंतच मुदत होती. जी संपली आहे. पण आता बँकांनी ती मुदत वाढवून 30 जून 2021 केली आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांचं या विशेष योजनेत गुंतवणूक करण्याचं राहून गेलं असेल त्यांना आता ती करता येणार आहे. सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना हा मोठा दिलासा आहे. स्टेट बँक - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं या योजनेची मुदत 30 जून 2021 केली आहे. सध्या बँकेचा सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच वर्षे कालावधीच्या मुदत ठेवीचा व्याजदर (Interest Rate) 5.4 टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेसाठी मात्र हा व्याजदर 6.20 टक्के इतका आहे. हे वाचा - फक्त 156 रुपयांत कोरोनावर उपचार; या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचा खर्च मिळणार 5 वर्षे किंवा जास्त कालावधीच्या मुदत ठेव योजनेसाठी हा व्याजदर लागू आहे. एचडीएफसी बँक - एचडीएफसी बँकेनंही खास सीनियर सिटीझन केअर योजना (Senior Citizen Care Scheme) सुरू केली असून या योजनेसाठी बँक पाऊण टक्का अधिक व्याजदर देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केल्यास त्यांना मुदत ठेवीवर (FD) 6.25 टक्के दरानं व्याज मिळेल. बँक ऑफ बडोदा - बँक ऑफ बडोदाच्या 5 ते 10 वर्षे कालावधीच्या विशेष मुदत ठेव योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींसाठी 6.25 टक्के व्याजदर देण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँक - आयसीआयसीआय बँकेनंही ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (ICICI Bank Golden Years Scheme) ही एक खास मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत बँक इतरांपेक्षा 0.80 टक्के अधिक व्याज दर देत असून हा व्याजदर 6.30 टक्के इतका आहे.