‘या’ दोन बँकांचा ग्राहकांना दणका! कर्ज झालं महाग, चेक करा नवे व्याजदर
मुंबई, 9 नोव्हेंबर**:** तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजेच IOB कडून कर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, देशातील या दोन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठा धक्का दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. दोन्ही बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. नवे दर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. याआधी एसबीआयसह अनेक मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनीही कर्जाचे दर वाढवले आहेत. कोणत्या बँकेनं किती वाढवले दर-
हेही वाचा: NEFT आणि IMPS मध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वांत चांगला
या बँकांनीही वाढवले व्याजदर: अलीकडेच HDFC बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ केली होती. HDFC बँकेपाठोपाठ आणखी एका बँकेनं व्याजदर वाढवलं आहे. त्यामुळे EMI आणि व्याजदर वाढल्याने ग्राहकांवर अधिकचा खर्चाचा बोझा पडणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये 15 ते 20 बेसिस पॉइंटने वाढ केली. याशिवाय रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेटमध्येही वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर 7 नोव्हेंबर 2022 पासून म्हणजेच सोमवारपासून लागू झाले आहेत. या बँकांनंतर बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इंडियन ओव्हरसीज बँकेनं व्याजदर वाढवल्यांमुळं ग्राहकांना फटका बसणार आहे.