मुंबई, 12 ऑगस्ट : भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले असून आता या यादीत एका मोठ्या बँकेचे नाव जोडले गेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने विविध मुदतीच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. 12 ऑगस्टपासून नवीन दर लागू बँक ऑफ बडोदाने बुधवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांनी एमसीएलआर दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. हे 12 ऑगस्टपासून लागू होणार आहे. एक वर्षाचा बेंचमार्क एमसीएलआर 7.65 टक्क्यांवरून 7.70 टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहक कर्जांचे व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात. रेपो दरवाढीचा अनेकांना फायदा; ‘या’ दोन बँकांनी आपल्या FD व्याजदरात केली वाढ एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जासाठी MCLR 0.20 टक्क्यांनी वाढवून 7.40 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.45 आणि 7.55 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल EMI मध्ये वाढ होणार MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतांश ग्राहक कर्जे किरकोळ किमतीवर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते. RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर केले आणि सांगितले की रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. आरबीआयने या वर्षी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे.