JOIN US
मराठी बातम्या / मनी / 'या' सरकारी बँकेने वाढवले व्याजदर, FD वर मिळतंय जास्त रिटर्न, आता किती होणार फायदा?

'या' सरकारी बँकेने वाढवले व्याजदर, FD वर मिळतंय जास्त रिटर्न, आता किती होणार फायदा?

गुंतवणुकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट हा पर्याय अनेकांना सोयीचा वाटतो. कारण यामध्ये रिस्क कमी असते. नुकतंच एका सरकारी बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत.

जाहिरात

बँक ऑफ बडोदाने वाढवले एफडी रेट्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मे: अनेक बँकांनी एफडी वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. त्यामुळे एफडीकडे लोकांचे आकर्षणही वाढलेय. तुम्हीही सरकारी बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ऋणदाता, बँक ऑफ बडोदाने निवडक अवधीसाठीच्या देशांतर्गत फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात 30 bps पर्यंत वाढ केली आहे. यामध्ये एनआरओ आणि एनआरई मुदत ठेवींचाही समावेश आहे. तसेच, बँकेने आपल्या बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीमवरील व्याजदरात वाढ केली आहे, ज्याचा कालावधी 399 दिवसांचा आहे.

2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिटवर, बँक सामान्य नागरिकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज देत आहे. पूर्वी हे दर अनुक्रमे 7.05% आणि 7.55% होते. नवे दर 12 मे पासून लागू झाले आहेत. यापूर्वी बँकेने मार्च आणि डिसेंबर 2022 मध्ये मुदत ठेवींच्या दरात वाढ केली होती.

आता FD वर किती व्याज मिळत आहे ते जाणून घ्या

बँक पुढील 7 ते 45 दिवसांत मॅच्योअर होणाऱ्या ठेवींवर 3 टक्के व्याजदर देत आहे. 46 ते 180 दिवसांत मॅच्योअर होणाऱ्या FD वर 4.5 टक्के दराने व्याज मिळेल. 181 ते 210 दिवसांच्या FD वर बँक 4.5 टक्के व्याज देत आहे. 211 दिवस किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. बँक एक ते दोन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 6.75 टक्के दराने व्याज मिळेल.

तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका ‘या’ चुका, अन्यथा…

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर

बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 ते 45 दिवसांच्या परिपक्वतेच्या जमा राशीवर 3.5 टक्के व्याजदर देते. 46 ते 180 दिवसांच्या कालावधीत मॅच्योअर होणाऱ्या FD वर 5 टक्के व्याजदर दिला जाईल. 181 ते 210 दिवसांच्या कालावधीत मॅच्योअर होणाऱ्या ठेवींवर 5.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांना 211 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत मॅच्योअर होणाऱ्या डिपॉझिटवर 6.25 टक्के दराने व्याज मिळेल. एक ते दोन वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर, ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याजदर दिलं जाईल.

Investment Tips: एफडी प्रमाणे व्याज देतात ‘या’ सरकारी योजना, पाहा पूर्ण लिस्ट!

संबंधित बातम्या

बँक ऑफ बडोदा, बडोदा तिरंगा प्लस डिपॉझिट स्कीम (399 दिवस) वर सामान्य नागरिकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना7.75 टक्के व्याजदर देत आहे. बँक 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर देत आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या FD वर, बँक सर्वसामान्य नागरिकांना 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देत आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या FD वर, बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.05 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदर देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या