JOIN US
मराठी बातम्या / मनी / Bank Holiday in August 2022: ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील बँका 11 दिवस बंद; आर्थिक कामांचं नियोजन करण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday in August 2022: ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील बँका 11 दिवस बंद; आर्थिक कामांचं नियोजन करण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in August 2022: ऑगस्ट महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल आहे. तुम्ही जर काही आर्थिक कामांचं नियोजन केलं असेल, तर तुम्हाला बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणं आवश्यक आहे.

जाहिरात

Bank Holiday in August 2022: ऑगस्टमध्ये बँका 11 दिवस बंद; आर्थिक कामांचं नियोजन करण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै: जुलै महिना संपून ऑगस्ट महिना सुरु व्हायला आता जेमतेम काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. हा महिना आपल्यासाठी अनेक अर्थांनी खास आहे. कारण या महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल आहे. त्यामुळं तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. परंतु तुम्ही जर पुढच्या महिन्यात काही आर्थिक कामांचं नियोजन केलं असेल, तर मात्र तुम्हाला बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) ऑगस्ट 2022 साठी कॅलेंडर जारी केलं आहे. या कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्यात देशभरातील बँका साधारणपणे अर्धा महिना बंद (Bank Holidays in August 2022) असणार आहेत. देशभरातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या अधिकृत सुट्ट्या, विविध सण-उत्सव तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्या इत्यादी पकडून एकूण 13 दिवस बंद राहणार आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑगस्टमध्ये विविध सण आहेत. अशा प्रसंगी विविध राज्यांतील बँकांच्या स्थानिक शाखाही बंद राहतील. तुम्हालाही पुढच्या महिन्यात बँकेत जायचं असेल किंवा काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर तुमचं काम ताबडतोब करा, कारण ऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. तथापि, आजकाल आपण ऑनलाइन सुविधा वापरल्यास आपण घरून काम करू शकता. ऑगस्ट 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी: पुढील महिन्यात दोन शनिवार आणि पाच रविवारी मिळून बँका सात दिवस बंद असणार आहेत.

हेही वाचा-  Cibil Score : चांगला पगार असूनही बँकेनं कर्ज नाकारलं? ’हे’ एक काम मिळवून देईल लोन ऑगस्टमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या- ऑगस्टमध्ये काही राष्ट्रीय तसेच प्रादेशिक सुट्ट्या आहेत. यातील काही सुट्टया देशभरात तर काही सुट्ट्या ठराविक राज्यांपुरत्या मर्यादित आहेत.

महाराष्ट्रातील बँकांना 11 दिवस सुट्टी- ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील बँका 11 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या मिळून 7 साप्ताहिक सुट्ट्या याशिवाय 8 ऑगस्ट रोजी मोहरम, 11 तारखेला रक्षाबंधन, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि  31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रातील बँका बंद राहणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या