ramdev baba
आशुतोष वर्मा, प्रतिनिधी नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली फूड्सला मोठा दणका बसला आहे. योगगुरु ते व्यवसायिक असा त्यांचा प्रवास संपूर्ण जगाने पाहिला आहे. आता त्यांच्या पतंजली फूड्स कंपनीला मोठा दणका बसला आहे. यामुळे सध्या पतंजली चर्चेत आलं आहे. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार पतंजली आयुर्वेदाची सब्सिडियरी असलेल्या पतंजली फूड्सच्या स्टॉकमध्ये आज घसरण होत आहे. पतंजली फूड्सच्या शेअरवर 5% चं लोअर सर्किट लावण्यात आलं. आता व्यवस्थापनाच्या वक्तव्यानंतर आणि बाजारातील रिकव्हरीनंतर या शेअरमध्येही थोडी रिकव्हरी होत असल्याचं दिसून येत आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की 29.25 कोटी शेअर्स फ्रीज करण्यात आले आहेत. ही कारवाई फक्त पतंजली फूड्सवरच नाही तर इतर 20 कंपन्यांवरही करण्यात आली आहे. सार्वजनिक शेअर होल्डिंगचे नियम न पाळल्यानं या सर्व कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
वर्षाला 29 लाख कमावणारे कुटुंबही गरीब; या देशात गरिबीची व्याख्याच विचित्र; फक्त 10% लोक BPLमध्येसेबीच्या नियमानुसार लिस्टेड कंपन्यांची 25 टक्के भागीदारी ही पब्लिक शेअर होल्डर्सकडे असायला हवी. तर पतंजली फूड्सने 2022 सप्टेंबरपर्यंत आपल्या शेअर्समधील 19.18 टक्के भाग हा पब्लिक शेअर होल्डर्सकडे दिला. त्यांनी नियमाचं पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
आज सकाळी 11:45 वाजता नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर, पतंजली फूड्सचा शेअर 31.35 रुपयांनी म्हणजेच 3.25% ने कमी होऊन 933.05 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करताना दिसला. गेल्या 3 वर्षात या समभागाने गुंतवणूकदारांना 800% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. परंतु, या वर्षी आतापर्यंत स्टॉकमध्ये सुमारे 23% घट झाली आहे.