‘या’ लोकांना मिळतं निळ्या रंगाचं Aadhaar Card, प्रक्रिया आहे खूपच सोपी
मुंबई, 22 ऑगस्ट: निळ्या रंगाच्या आधार कार्डबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. आजकाल आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं दस्तावेज बनलं आहे. बँकिंग, वाहन नोंदणी आणि विमा पॉलिसींसह इतर अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. आधार कार्डमध्ये तुमच्या बायोमेट्रिक्सची माहिती असते ज्यामुळे ते आणखी महत्त्वाचे बनतं. UIDAI नं आपलं ऑनलाइन पोर्टल उघडलं आहे. या पोर्टलमधून लोकांना त्यांच्या आधारकार्ड डिटेल्स अपडेट करता येतात. केवळ वृद्धांसाठीच नाही तर सरकारनं 5 वर्षांखालील मुलांसाठीही ब्लू आधार कार्ड उपलब्ध करून दिलं आहे. त्याला बाल आधार कार्ड (Baal Aadhaar Card) असंही म्हणतात. बाल आधार हे पाच वर्षांखालील मुलांसाठी आहे आणि निळ्या रंगाचं असतं. या आधार कार्डसाठी मुलाच्या बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नाही. मूल 5 वर्षांचं झाल्यावर त्याचं बायोमेट्रिक्स आधार कार्डवर अपडेट करावं लागेल. बाल आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे:
हेही वाचा- Whatsapp मेसेज चुकून डिलीट झालाय? ‘या’ नव्या फीचरनं करू शकता रिकव्हर मुलांचं आधार कार्ड कसं अपडेट करायचं? स्टेप 1: UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. स्टेप 2: आधार कार्ड नोंदणी लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: मुलाचे नाव, पालकांचा फोन नंबर, ई-मेल पत्ता यासह सर्व आवश्यक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा. स्टेप 4: सर्व वैयक्तिक तपशील प्रविष्ट केल्यानंतर, सर्व माहिती भरावी लागेल. स्टेप 5: नंतर पुढे जा आणि फिक्स अपॉइंटमेंट टॅबवर क्लिक करा. आता आधार कार्डसाठी नोंदणीची तारीख निश्चित करा. स्टेप 6: अर्जदार नोंदणी प्रक्रियेसह पुढे जाण्यासाठी त्याचे/तिचे जवळचे नावनोंदणी केंद्र निवडू शकतात. स्टेप 7: सर्व आवश्यक कागदपत्रांसह त्याच तारखेला नावनोंदणी केंद्राला भेट द्या. कागदपत्रांसोबत रेफरन्स क्रमांक सोबत ठेवा. स्टेप 8: सर्व अधिकार्यांनी तपशील तपासल्यानंतर, जर मुलाचं वय 5 वर्षे असेल, तर बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल आणि ती आधार कार्डशी लिंक केली जाईल. मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असल्यास बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार नाही. स्टेप 9: प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जदाराला एक पावती दिली जाईल, जी आधार कार्ड ट्रॅक करण्यासाठी वापरली जाऊ शकते. स्टेप 10: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे माहिती प्राप्त होईल. स्टेप 11: नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला 60 दिवसांच्या आत एसएमएस प्राप्त होईल. मुलाला आधार कार्ड दिले जाईल.