नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : तुम्ही जर कोणत्याही बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण, अॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 9 सप्टेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने 7 दिवस ते 6 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर व्याजदरात 25 आधार अंकांची वाढ केली आहे. Axis बँकेने ऑगस्टमध्ये 17 महिन्यांच्या आणि 18 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वरील व्याजदरातही वाढ केली होती. मात्र, उर्वरित मुदतीच्या FD चे व्याजदर तसेच ठेवले होते. बँक 7 दिवस ते 29 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 2.75% व्याज देणार आहे. तर 30 दिवस ते 3 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.25% व्याज देईल. त्याचप्रमाणे, 3 महिने ते 6 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर, Axis Bank आता वार्षिक 3.75% दराने व्याज देणार आहे. तर 6 ते 7 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4.40 टक्के व्याज मिळणार आहे. आता ग्राहकांना 7 ते 8 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65% व्याज तर 9 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर देखील 4.65% व्याजदर मिळेल. वाचा - सॉव्हरेन गोल्ड बाँडवर कसा आणि किती टॅक्स भरावा लागतो? गुंतवणुकीआधी समजून घ्या किती व्याज मिळेल 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांमध्ये मॅच्युअर होणार्या FD वर, 5.45% व्याजदर दिले जाईल आणि 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांमध्ये मॅच्युअर होणार्या FD वर, बँक 5.75 व्याजदर देत राहील. Axis Bank 1 वर्ष 25 दिवस ते 2 वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5.60% व्याजदर देते. तर 2 ते 5 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5.70 टक्के दराने व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे 5 ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळणार बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 29 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.75 टक्के व्याज देईल. त्याचप्रमाणे 30 दिवस ते 3 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3.25 टक्के व्याज मिळेल आणि 3 ते 6 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3.75 टक्के व्याज मिळेल. 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 6.20 टक्के आणि 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळत आहे.