JOIN US
मराठी बातम्या / मनी / कधी सुरू होणार विमानसेवा? जाणून घ्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय दिली माहिती

कधी सुरू होणार विमानसेवा? जाणून घ्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय दिली माहिती

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी माहिती दिली आहे की, नागरी उड्डाण मंत्रालय, विमानतळ संचालक आणि विमानकंपन्या पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मे : नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी माहिती दिली आहे की, नागरी उड्डाण मंत्रालय, विमानतळ संचालक आणि विमानकंपन्या पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार आहेत. हे सर्वजण केंद्र आणि राज्य सरकारांकडून हिरवा कंदिल मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पुरी यांनी ट्विटरवरून अशी माहिती दिली की, देशांतर्गत उड्डाणं पुन्हा सुरू करण्यासाठी केवळ @MoCA_GoI नागरी उड्डाण मंत्रालय किंवा केंद्र सरकार निर्णय घेत नाही. याकरता राज्य सरकारांची देखील मंजूरी मिळणे आवश्यक आहे.

25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे सध्या देशभरात 650 विमानं जमिनीवरच आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयाने काही नियमावलीचा प्रस्ताव विमान कंपन्यांकडून घेतला होता. विमान प्रवासाच्या 2 तास आधी टर्मिनलवर रिपोर्टिंग, वेब-चेक इन अनिवार्य, त्याचप्रमाणे प्रवाशांना डिस्पोजेबल व्यक्तिगत सुरक्षा उपकरण देण्याच्या पर्यायांबाबत हा प्रस्ताव होता. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यवसायिकांसाठी खूशखबर! फेसबुक सुरू करणार ‘ऑनलाइन दुकान’ ) त्याचप्रमाणे विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग देखील आवश्यक राहील. प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं देखील अनिवार्य राहील. इंडिगो आणि विस्ताराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्या देशांतर्गत उड्डाणांसाठी बुकिंग करत आहेत. मात्र अद्याप स्पाइसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गोएअरकडून बुकिंग सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सोमवारी भारतीय हवाई यात्री असोसिएशन (APAI) चे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर रेड्डी यांनी बुकिंग सुरू करण्यासाठी काही एअरलाइन कंपन्यांवर टीका केली आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या