JOIN US
मराठी बातम्या / मनी / रोज 7 रुपयांची बचत केल्यास मिळू शकेल 60 हजारांची पेन्शन, वाचा मोदी सरकारच्या या योजनेबद्दल

रोज 7 रुपयांची बचत केल्यास मिळू शकेल 60 हजारांची पेन्शन, वाचा मोदी सरकारच्या या योजनेबद्दल

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) केंद्र सरकारची एक सोशल सिक्युरिटी योजना आहे. या योजने अंतर्गत 7 रुपये प्रति दिन इतकी गुंतवणूक केल्यानंतर वार्षिक 60 हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळू शकेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 मे : अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojna) केंद्र सरकारची एक सोशल सिक्युरिटी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार असंघटित क्षेत्रांमध्ये ((Unorganized Sector) काम करणाऱ्या लोकांना प्रति महिना 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन देते. 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेमध्ये (APY) खाते उघडू शकते. या सरकारी योजनेची विशेष बाब म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढा तुम्हाला त्यातून अधिक फंड मिळेल. 25 वयापासून दर महिन्याला किती कराल गुंतवणूक? अंसघटित क्षेत्रामध्ये कोणतीही 25 वर्ष वय असणारी व्यक्ती या योजनेमध्ये जर गुंतवणूक करू इच्छित असेल तर तर प्रति महिना त्याला केवळ 376 रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल. (हे वाचा- सोन्याचे भाव उतरले तर चांदी 530 रुपयांनी वधारली, वाचा काय आहेत दर ) याप्रकारे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून त्याने 376 रुपये प्रति महा जमा केल्यास 60 वर्ष वयानंतर त्याला दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. दररोज 7 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळेल 5 हजार रुपयांचे पेन्शन या खात्यामध्ये 60 वयवर्ष होईपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 60 वर्ष वय झाल्यानंतर संबधित व्यक्तील दर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल. जर 18 वयवर्षापासून एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास दर महिन्याला तीला 210 रुपये या योजनेसाठी द्यावे लागतील, तर तो साठाव्या वर्षापासून 5 हजार रुपये पेन्शन मिळवू शकेल. (हे वाचा- 1 जूनपासून बदलणार रेशन कार्ड संबंधित अनेक नियम, वाचा सविस्तर ) वयाच्या अठराव्या वर्षापासूनच्या या गुंतवणुकीचं गणित केल्यास संबधित व्यक्तीला केवळ 7 रुपये प्रति दिन इतकी गुंतवणूक करायची आहे. तर वयाच्या साठाव्या वर्षी वार्षिक 60 हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळेल. कुठे उघडाल या योजनेसाठी खाते? कोणत्याही सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेसाठी खाते उघडता येईल. एका व्यक्तीला एकच अटल पेन्शन योजना खाते उघडण्याची मुभा आहे. या योजनेमध्ये पेन्शनरच्या मृत्यूनंतर पती/पत्नी याचा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा आहे. मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे इनकम टॅक्स कायदा (Income Tax Act.) सेक्शन 80C अंतर्गत या या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सूट देखील मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या