JOIN US
मराठी बातम्या / मनी / Cryptocurrency Arjun Khotkar : क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा, शिंदे गटातील बडा नेता फसला, पोलिसात गुन्हा दाखल

Cryptocurrency Arjun Khotkar : क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा, शिंदे गटातील बडा नेता फसला, पोलिसात गुन्हा दाखल

क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठा घोटाळा झाल्याप्रकरणी अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवी जैस्वाल (जालना),17 जानेवारी : शिंदे गटातील महत्त्वाचे नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.  यामुळे खोतकर यांचे जावई अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेवरून जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा :  महाविकासआघाडीमध्ये खडाखडी! संजय राऊतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

संबंधित बातम्या

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील महत्त्वाचे नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यात किरण खरात यांना क्रिप्टो करंसीमध्ये बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाली होती.

त्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन अनेकांनी क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवले होते. त्यानुसार विजय झोल यांनीही पैसे गुंतवले, मात्र जागतिक मंदी असल्याने अनेकांचे पैसे बुडाले. यात विजय यांचेही पैसे बुडाल्याने झोल यांनी किरण खरात यांना किडन्याप केल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान किरण खरात यांनी पोलिसात धाव घेत प्राॅपर्टी बळकावल्याचा आरोप केला आहे.  

जाहिरात

हे ही वाचा :  उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार का? एकाचवेळी पक्षप्रमुख, शिवसेना अन् निवडणूक चिन्हावर सुनावणी

तर किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान खरात यांच्या तक्रारीवरून झोल यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या