JOIN US
मराठी बातम्या / मनी / टॅलेंट पाहून आनंद महिंद्रांनी ट्विटरवरच दिली नोकरीची ऑफर; तरुणाने असं केलंय तरी काय?

टॅलेंट पाहून आनंद महिंद्रांनी ट्विटरवरच दिली नोकरीची ऑफर; तरुणाने असं केलंय तरी काय?

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बॅटरीवर चालणाऱ्या जीपचा आहे. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओतील तरुणाची कल्पकता पाहून त्याला नोकरीची ऑफर दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. आनंद महिंद्रा अनेक विषयांवर व्यक्त होत असतात. किंवा एखाद्या व्हायरल व्हिडीओवर ते भाष्य करत असतात. आता आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बॅटरीवर चालणाऱ्या जीपचा आहे. तामिळनाडूच्या गौतम नावाच्या तरुणाने यात काही जुगाड केला आहे. गौतमची  कल्पकता आनंद महिंद्रा यांना एवढी आवडली की त्यांनी ट्विटरवर टॅग करून त्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. त्यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे सीनियर एक्झिक्युटिव्ह आर वेलुस्वामी यांना या तरुणांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले की, त्यांचा ठाम विश्वास आहे की भारत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रेसर बनण्याच्या स्थितीत आहे. इलॉन मस्क यांचा पुणेकर मित्र पोहोचला थेट अमेरिकेत, कशी होती जगातील श्रीमंत व्यक्तीसोबतची भेट? घरच्याघरी जुगाड करुन इलेक्ट्रिक वाहन बनवणारा गौतम मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याने आपल्या इलेक्ट्रिक जीपचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्याला नोकरीची ऑफर दिली.

संबंधित बातम्या

गौतमने त्याच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक जीप अशा प्रकारे बनवली आहे की तिचे पुढील आणि मागील चाके स्वतंत्रपणे नियंत्रित करता येतील. त्याने त्याच्या इलेक्ट्रिक वाहनात लिथियम आयन बॅटरी वापरली आहे. ही जीप जंक मटेरियलपासून बनवली आहे. आनंद महिंद्रा यांना ही कल्पना खूप आवडली आहे. Toll Naka: 12 तासात रिटर्न आल्यास टोल टॅक्स भरावा लागणार नाही! व्हायरल मेसेजवर सरकारने म्हटलं… आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिले की, म्हणूनच मला विश्वास आहे की भारत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रेसर होऊ शकतो. इनोव्हेशनमुळे अमेरिकेने या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. गौतमसारख्यांमुळे इनोव्हेशन आणखी पुढे जाऊ शकते. गौतमनेही ट्विटरवर आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. गौतमने ही जीप शेतीच्या वापरण्यासाठी तयार केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या