JOIN US
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊन काळात 'या' उद्योगपतीनं कमावले तब्बल 3 लाख कोटी, वाचा काय आहे कारण

लॉकडाऊन काळात 'या' उद्योगपतीनं कमावले तब्बल 3 लाख कोटी, वाचा काय आहे कारण

जगातील नावाजलेले ई-कॉमर्स कंपनी Amazon चे सीईओ जेफ बेजोस यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात संपत्ती 4000 कोटी डॉलरने म्हणजेच साधारण 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे

जाहिरात

Rs.2000 new Indian currency notes issued by Indian government after demonetizing Rs.1000 notes to curb black (unaccounted) money. However,raids by enforce department have unearthed billions of new currency notes hoarded by black marketeers.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जून : ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्स (Bloomberg Billionaire Index) नुसार जगभरामधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची कमाई आता 155 अरब डॉलर आहे. म्हणजेच त्यांची नेटवर्थ 11.7 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांचा संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जेफ बेजोस (World Richest Person Jeff Bezos) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात त्यांची संपत्ती 4000 कोटी डॉलरने म्हणजेच साधारण 3.04 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. जगभरात लॉकडाऊन सुरू होता असला तरी ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही अडथळा आला नाही. जेफ बेजोस यांचा लॉकडाऊनमध्ये कसा झाला फायदा? बेजोस यांच्या वाढत्या संपत्तीचा एक महत्त्वाचा हिस्सा अ‍ॅमेझॉनच्या वाढणाऱ्या शेअर्समुळे आला आहे. ज्यावेळी इतर कंपन्यांसमोर आर्थिक संकट होते, त्यावेळी अ‍ॅमेझॉनचे शेअर्स तेजीमध्ये होते. या शेअर्सची किंमत कोरोना व्हायरस पँडेमिकच्या या कालावधीत 2000 डॉलरपेक्षाही वर होती. Amazon सीईओ जेफ बेजोस

Amazon सीईओ जेफ बेजोस

(हे वाचा- सोने विकत घेणार आहात? खरेदीबाबतच्या या नियमात होऊ शकतो मोठा बदल ) तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊनच्या काळात लोकं घरातच असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गरजेच्या वस्तू ई-कॉमर्स साइटवरून मागवणे पसंत केले. वाढणाऱ्या मागणीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांनी नवीन नियुक्ती देखील केली आहे. अ‍ॅमेझॉन भारतात देणार 50,000 नोकऱ्या अ‍ॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी मेच्या अखेरीस अशी माहिती दिली होती की, ते त्यांच्या ऑपरेशन नेटवर्कमध्ये जवळपास 50,000 सीझनल रोलसाठी नियुक्ती करत आहेत. जेणेकरून वाढणाऱ्या मागणीचा पुरवठा करता येईल आणि सध्याच्या कठीण परिस्थितीत काही कठीण सेवा देखील पुरवता येतील. ते म्हणाले की या परिस्थितीत नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी ते बांधील आहेत.   संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या