नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : देशामध्ये वेगाने विस्तार करणारी ई-कॉमर्स अॅमेझॉन इंडिया (Amazon India)ची फायनान्शिअल सेवा अॅमेझॉन पे (Amazon Pay) ने त्यांच्या युजर्ससाठी डिजीटल गोल्ड इनव्हेस्टमेंट फीचर ‘गोल्ड वॉल्ट’ (Gold Vault) जारी केले आहे. अॅमेझॉन पे ने अशी माहिती दिली आहे की, या सेवेसाठी कंपनीने सेफगोल्ड (SafeGold) बरोबर भागीदारी केली आहे. युजर्सना गोल्ड वॉल्टच्या माध्यमातून कमीत कमी 5 रुपयाचे डिजिटल सोने खरेदी करता येईल. या सुविधेनंतर अॅमेझॉन पे अन्य डिजीटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या पेटीएम (Paytm), फोनपे (PhonePe), गूगल पे (Google Pay), मोबिक्विक (MobiKwik), फ्रीचार्ज (Freecharge) यांच्याशी स्पर्धा आहे, जे युजर्सना सोने खरदेची संधी देतात. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, अॅमेझॉनच्या एका प्रवक्त्याने असे म्हटले आहे की आम्ही आमच्या ग्राहकांसाठी इनोव्हेशनमध्ये विश्वास ठेवतो जेणेकरून त्यांच्यासाठी नवीन अनुभव बनेल. (हे वाचा- 21 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता) ते पुढे म्हणाले की, या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी तसंच सेवा देण्यासाठी नवीन क्षेत्र आणि संधींचे निरंतर मूल्यांकन करीत आहोत. यामुळे अॅमेझॉन पे ला सेफगोल्डच्या भागीदारीत डिजिटल गोल्ड सेवा सुरू करण्यास प्रेरित केले आहे. (हे वाचा- रोज 100 रुपये वाचवून इथे करा गुंतवणूक,15 वर्षात तुमची मुलं होतील 34 लाखांचे मालक ) या सुविधेअंतर्गत अॅमेझॉनच्या ग्राहकांना कोणत्याही वेळी सोने खरेदी करण्याची आणि विकण्याची मुभा असेल. ग्राहकांना कोणत्याही समस्येशिवाय सुरक्षेसाठी लॉकर भाड्याने घेऊ शकतात. पेटीएम आणि फोन पे दोघांनी 2017 मध्ये डिजीटल गोल्डची सुविधा दिली आहे. तर गुरुग्राममधील मोबिक्विकने 2018 मध्ये ही सुविधा लाँच केली. गूगल पे ने गेल्यावर्षी 2019 मध्ये ही सुविधा ग्राहकांसाठी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे चिनी इलेक्ट्रॉनिक कंपनी Xiaomi ने त्यांचा पेमेंटसाठीचा प्लॅटफॉर्म MiPay वर देखील डिजीटल गोल्डचा पर्याय उपलब्ध आहे.