मुंबई, 7 मे : ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे (Alibaba) मालक जॅक मा (Jack Ma) यांचे सध्या वाईट दिवस सुरू असल्याचं दिसतंय. आधी चिनी सरकारशी (China Government) वाद झाल्यानंतर आजकाल ते सार्वजनिक ठिकाणी जास्त दिसत नाहीत, शिवाय त्यांची कंपनी अलिबाबा अनेक अडचणींना तोंड देत आहे. याच दरम्यान, शुक्रवारी अलिबाबाच्या मुख्यालयातून मा नावाच्या व्यक्तीला अटक झाल्याची बातमी समोर आली. ही बातमी समोर येताच अलिबाबाचे शेअर्स अचानक 9 टक्क्यांनी घसरले आणि कंपनीचं मोठं नुकसान झालं. अटक झालेली व्यक्ती आणि अलिबाबा कंपनीचे मालक जॅक मा या दोघांच्याही नावात साम्य असल्याने गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मा नावाच्या व्यक्तीला अलिबाबाच्या हाँगहोंझोऊ येथील मुख्यालयातून पकडण्यात आले आहे, असं चीनच्या सरकारी टीव्ही चॅनल सीसीटीव्हीने एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. तसंच या व्यक्तीला चीन सरकारविरोधातील भूमिका आणि चीनविरोधी विदेशी शक्तींशी हातमिळवणी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे, असंही या चॅनलने म्हटलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं. पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहकांना झटका; व्याजदरात वाढ, लोन किती महागणार? चेक करा अलिबाबाची मार्केट व्हॅल्यू 26 अब्ज डॉलरने कमी इतर अनेक मीडिया हाऊसेसनेही हा रिपोर्ट प्रसिद्ध केल्यामुळे ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral News) झाली. त्यामुळे हाँगकाँग शेअर बाजारामध्ये अलिबाबाच्या शेअर्सची जोरदार विक्री सुरू झाली. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, काही मिनिटांतच अलिबाबा कंपनीची मार्केट व्हॅल्यू (Market Value) 26 अब्ज डॉलरने कमी झाली. त्यानंतर कंपनीला स्पष्टीकरण देत जॅक मा यांना अटक करण्यात आलेली नाही, असं सांगावं लागलं. त्यानंतरच कंपनीच्या शेअर्सची विक्री थांबली आणि काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली. चीनचा आणखी एक सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सचे माजी मुख्य संपादक यांनीही संशयित व्यक्तीबद्दलचा पहिला रिपोर्ट लोकांची दिशाभूल करणारा होता, असं मत व्यक्त केलं. महागाईचा आणखी एक फटका, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ जॅक मा यांच्यावर चिनी सरकार नाराज मागील बऱ्याच काळापासून अलिबाबाचे मालक जॅक मा आणि चीन सरकारचे संबंध फारसे चांगले नाहीत. जॅक मा यांची कंपनी अँट ग्रुपचा (Ant Group) 2020 मध्ये जगातील सर्वांत मोठा IPO होता. पण लिस्टिंगच्या दोन दिवस आधी, चीन सरकारच्या हस्तक्षेपानंतर त्यांना आयपीओ मागे घ्यावा लागला होता. या प्रकरणानंतर बराच काळ जॅक मा कोणालाच कुठेही दिसले नाहीत. त्यानंतर चीन सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवल्याच्या बातम्या आल्या. चीन सरकारने गेल्या वर्षभरात आपल्या टेक कंपन्यांवर कडक कारवाई केली आहे. डेटा प्रायव्हसी आणि मक्तेदारी विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला चिनी नियामकांकडून चौकशीचा सामना करावा लागत आहे.