मुंबई, 25 फेब्रुवरी : भारतात सध्या 6 पेमेंट बँका आहेत. एअरटेल पेमेंट्स बँक (Airtel Payments Bank) आणि पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) या त्यापैकी दोन आहेत ज्या जनतेपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. एअरटेल पेमेंट्स बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक यांचा वापर अनेकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. पेमेंट बँक खाते सामान्यतः बिल भरण्यासाठी वापरले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की ते तुमच्या ठेवींवर व्याजही देतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. एअरटेल पेमेंट्स बँक व्याजदर (Airtel Payments Bank Interest Rates) एअरटेल पेमेंट्स बँक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत खात्यावरील ठेवींवर 6 टक्के वार्षिक व्याजदर देते, तर 1 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 2.5 टक्के व्याजदर दिला जातो. Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, पाहा काय आहेत नवे दर? एअरटेल पेमेंट्स बँकेचे फायदे (Benefits of Airtel Payments Bank) एअरटेल पेमेंट्स बँक डिजिटल बचत खाते (Digital Saving Account) हे पेपरलेस खाते आहे. ते आधार आधारित ई-केवायसी वापरून उघडता येते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, फक्त ग्राहकाचा आधार क्रमांक आवश्यक आहे. एअरटेल थँक्स अॅप वापरून ग्राहक काही मिनिटांत एअरटेल पेमेंट्स बँक खाते डिजिटली व्हिडीओ कॉलसह उघडू शकतात. पेटीएम पेमेंट्स बँक व्याज दर (Paytm Payments Bank Interest rate) पेटीएम पेमेंट्स बँक डिजिटल बचत खात्यावर दरवर्षी 2.5 टक्के दराने व्याज देते. पेटीएम पेमेंट्स बँक इंडसइंड बँकेच्या भागीदारीत एफडी देखील ऑफर करते. पेटीएम पेमेंट बँक एफडी खात्यावर 5.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. येत्या 28 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या IFSC, MICR कोडमध्ये बदल होणार, वाचा सविस्तर पेटीएम पेमेंट्स बँकेचे फायदे पेटीएम पेमेंट्स बँकेचे डिजिटल बचत खाते आहे ज्यामध्ये खाते उघडण्याचे कोणतेही शुल्क नाही आणि किमान शिल्लक नियम नाहीत. गुंतवणूकदाराला फक्त 2 लाख रुपये ठेवण्याची गरज आहे. 2 लाख ठेवीवर विना अकाऊंट शुल्क, जोखीम मुक्त ठेव, व्हिसा डेबिट कार्ड यासारखे फायदे घेऊ मिळतात. डिजिटल बचत खात्यासह, ग्राहकांना रिअल-टाइम अपडेटेड पासबुक मिळते.