JOIN US
मराठी बातम्या / मनी / शेतकऱ्यांनो, तुमच्या अडचणी होणार एका क्लिकमध्ये दूर, घरबसल्या घ्या मोफत फायदा, Video

शेतकऱ्यांनो, तुमच्या अडचणी होणार एका क्लिकमध्ये दूर, घरबसल्या घ्या मोफत फायदा, Video

शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर मिळावीत यासाठी शेतकऱ्यानच पुढाकार घेतलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक 22 मे : शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या तरी संकटाचा सामना करावा लागतो. या आपत्तींमुळे त्यांचं मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा, त्यांना संभाव्य अडचणींची सूचना मिळावी यासाठी नाशिकच्या शेतकऱ्यानं एक खास ॲप तयार केलंय. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयी प्रत्येक माहिती अगदी घरबसल्या मोफत मिळणार आहे. कसं आहे ॲप? नाशिकचे शेतकरी सुनील दिंडे यांनी हे ॲप तयार केलंय. डॉक्टर किसान ॲप असं त्याचं नाव आहे. या ॲपच्या माध्यमातून कोणत्या भागात कोणतं पिकं घ्यावं? आधुनिक पद्धतीनं शेती कशी करावी? हवामानाचा अंदाज, शेती विषयी सरकारी योजना या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. हे ॲप पूर्णपणे मोफत आहे .तुम्हाला याचे कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांचं हित समोर ठेऊन हे डॉक्टर किसान ॲप तयार करण्यात आलंय.  शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होईल, ’ असं दिंडे यांनी सांगितलं.

कसं करणार डाऊनलोड? ‘हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल प्ले स्टोररमध्ये जा. तिथं डॉक्टर किसान ॲप सर्च करा. ते ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करा.  ॲप इंस्टॉल झाल्यानंतर त्यामध्ये तुमची माहिती भरा आणि ॲप ओपन करा. शेती विषयी सर्व माहिती तुम्हाला मिळेल,’ अशी माहिती दिंडे यांनी दिली आहे. कडक उन्हात पिकं जातील सुकून, काय करावं? हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणती माहिती मिळेल? - तुम्हाला पिकांविषयी अडचण असल्यास ॲपमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा - नोटिफिकेशनद्वारे वेळोवेळी मोफत असा योग्य आणि अनुभवी मार्गदर्शन सल्ला मिळेल.• - चार दिवसांचा हवामान अंदाज तुम्हाला बघता येईल. -तुमच्या पिकांच्या सध्यस्थितीनुसार तज्ञ आणि अनुभवी ऑनलाईन मार्गदर्शन सेवा - सरकारी योजनाबद्दल अद्ययावत माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर ताज्या बातम्या, माहितीपूर्ण व्हिडीओ आणि लेख, जवळच्या विश्वासू कृषी सेवा केंद्रांची माहिती, तसंच सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरही यामधून शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या