मुंबई, 20 जून : केंद्र सरकारच्या अग्निपथ लष्करी भरती योजनेला (Agneepath Scheme) बिहार, झारखंड, यूपीसह अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. देशभरात गदारोळ सुरू असताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोमवारी प्रशिक्षित आणि पात्र अग्निवीरांच्या भरतीची घोषणा केली. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियाच्या (Social Madia) माध्यमातून म्हटलं की, ‘अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आहे. गेल्या वर्षी जेव्हा ही योजना आणली गेली तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुन्हा सांगतो की अग्निवीरांची शिस्त आणि कौशल्य त्यांना रोजगारक्षम बनवेल. या आहेत जगातील 10 शक्तिशाली सेना, भारताचे स्थान जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान! अग्निवीरांना नोकरीची ऑफर महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, “अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी अत्यंत दु:खी आणि निराश झालो आहे. गेल्या वर्षी, जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हटले होते की अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्य त्याला नक्कीच रोजगारक्षम बनवेल. त्यांनी पुढे लिहिले की, महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित आणि सक्षम तरुणांना येथे नोकरीची संधी देईल.
Bharat Bandh: अग्निपथ योजनेला विरोध वाढला, सोमवारी भारत बंदची हाक, अनेक राज्यांमध्ये शाळा बंद
अनेक गाड्या रद्द
‘अग्निपथ’ योजनेला सुरू असलेल्या विरोधामुळे पूर्व रेल्वेने रविवारी कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांना जोडणाऱ्या 29 गाड्या रद्द केल्या. बिहारच्या विविध भागात, महाराष्ट्रातील वांद्रे आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दोन गाड्या कमी करण्यात आल्या आहेत.