JOIN US
मराठी बातम्या / मनी / Adani Wilmar शेअरमध्ये जबरदस्त तेजी; तज्ज्ञांच्या मते शेअर खरेदीचं योग्य टायमिंग काय?

Adani Wilmar शेअरमध्ये जबरदस्त तेजी; तज्ज्ञांच्या मते शेअर खरेदीचं योग्य टायमिंग काय?

अदानी विल्मरच्या (Adani Wilmar Share Price) शेअर्सची किंमत खूप जास्त असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या टप्प्यावर गुंतवणूकदार प्रॉफिट बुक करू शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी : अदानी विल्मरच्या आयपीओमध्ये (Adani Wilmar IPO) ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांची अक्षरश: लॉटरी लागली. कारण अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये लिस्टिंग झाल्यानंतर, सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात वाढ झाली आहे. FMCG कंपनीच्या शेअर्सनी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये 15 टक्क्यांहून अधिक उसळी नोंदवली. अदानी विल्मारचे शेअर्स आज प्रति शेअर 34 रुपयांच्या वाढीसह उघडले आणि एनएसईवर प्रति शेअर 381 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले. अदानी विल्मारच्या शेअर्सची किंमत खूप जास्त असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या टप्प्यावर गुंतवणूकदार प्रॉफिट बुक करू शकतात. मात्र जास्त जोखीम घेणारे गुंतवणूकदार 319 च्या पातळीवर स्टॉप लॉस लावू शकतात. अदानी ग्रुपचा शेअर 410 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो, असं तज्ज्ञांना वाटतं. स्टॉक 410 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता सांगतात की, आज अदानी विल्मरच्या शेअरची किंमत 350 रुपयांची पातळी ओलांडली आहे. जास्तीची जोखीम घेणारे गुंतवणूकदार 328 रुपयांच्या स्टॉप लॉससह शेअर्स होल्ड करु शकतात. FMCG कंपनीचा शेअर (FMCG Stocks) 400 ते 410 रुपयांची संभाव्य पातळी गाठू शकतो. LIC IPO : एलआयसी 11 फेब्रुवारीला सेबीकडे DRHP सादर करणार, IRDAI कडून IPO प्रस्ताव पास प्रॉफिट बुकिंगचा सल्ला GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल सांगतात की, अदानी ग्रुपचे शेअर्स लिस्टिंगनंतर वाढत आहेत. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे ते सध्याच्या पातळीवर प्रॉफिट बुक करू शकतात. जास्त जोखीम घेणारे गुंतवणूकदार प्रति शेअर 321.90 रुपयांवर स्टॉप लॉस लावू शकतात. Paytm ची भन्नाट ऑफर, UPI ट्रान्सफरवर मिळेल Cashback; असा घेता येईल फायदा प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले की, अदानी विल्मारच्या शेअरची किंमत खूप चांगली आहे. एखाद्याने सध्याच्या पातळीवर नवीन पोझिशन घेणे टाळले पाहिजे कारण स्टॉकमध्ये कधीही प्रॉफिट बुकींग सुरू होऊ शकते. अदानी विल्मर ही FMCG कंपनी असून तिचे ऑपरेटिंग मार्जिन सुमारे 5-6 टक्के आहे. त्यामुळे काउंटरमधील स्टॉकमध्ये एवढी मोठी उडी अपेक्षित नव्हती. परंतु, जेव्हा असा लाभ भागधारकांना उपलब्ध असेल, तेव्हा प्रॉफिट बुक करणे आणि करेक्शनची प्रतीक्षा करणे चांगले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या