JOIN US
मराठी बातम्या / मनी / Anniversary of GST: मोबाईल-फ्रिजसह अनेक गृहउपयोगी वस्तूंवरील GST सरकारने कमी केला का? पूर्ण प्रकरण काय?

Anniversary of GST: मोबाईल-फ्रिजसह अनेक गृहउपयोगी वस्तूंवरील GST सरकारने कमी केला का? पूर्ण प्रकरण काय?

6th Anniversary of GST: जीएसटीच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त अर्थ मंत्रालय आणि पीआयबी सतत जीएसटीचे फायदे सांगणारे ट्विट करत आहे.

जाहिरात

सरकारने जीएसटी खरंच कमी केला का?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जुलै : देशाच्या स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून 1 जुलै 2017 रोजी वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. आज जीएसटी लागू करुन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 6 वर्षांत जीएसटीने देशाच्या इनडायरेक्ट टॅक्स सिस्टमला नवसंजीवनी दिली आहे. दरम्यान, सरकारने मोबाईल-फ्रिजसह अनेक गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी दर कमी केल्याने ते स्वस्त झाल्याचे सोशल मीडिया आणि काही वृत्तांतून सांगितले जात आहे. जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय? जीएसटीला 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अर्थ मंत्रालय आणि पीआयबी सतत ट्विट करत आहेत की जीएसटी लागू झाल्यानंतर देशाला काय फायदा झाला. एक ट्विट जीएसटी लागू झाल्यानंतर आणि आधीच्या दरांच्या विश्लेषणावर आहे. या ट्विटमध्ये लिहिलेय आहे की, जीएसटी लागू होण्यापूर्वी मोबाईल फोन आणि इतर गृहोपयोगी वस्तूंवर किती कर भरला जात होता. यासोबतच जीएसटी लागू झाल्यानंतरचे कर दर येथे दाखवण्यात आले आहेत. म्हणजेच सरकारने नुकताच मोबाईल फोनसह होम प्‍लॅनवरील GST दरात कोणताही बदल केलेला नाही. Credit Card ने चुकूनही करु नका ‘ही’ 3 कामं, होईल मोठं नुकसान! 6 वर्षात मोबाईल फोनवरील GST मध्ये 19.3% कपात 6 वर्षांपूर्वी आणि आताची तुलना करता, सरकारने मोबाईल फोनवरील जीएसटी 19.3 टक्क्यांनी कमी केला आहे. पूर्वी लोकांना मोबाईल फोन खरेदीवर 31.3% GST भरावा लागत होता, पण आता फक्त 12% GST भरावा लागतो. Saving Scheme: महिलांसाठीच्या ‘या’ स्किमला मिळतोय जबरदस्त रिस्पॉन्स, 10 लाखांहून अधिक महिलांनी टाकले पैसे जूनमध्ये GST कलेक्शन 12% वाढून 1.61 लाख कोटी रुपये झालेय विशेष म्हणजे, अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, जूनमध्ये जीएसटी कलेक्शन 12 टक्क्यांनी वाढून 1.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. सहा वर्षांपूर्वी 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून, एकूण कर चौथ्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालाय. वित्त मंत्रालयाने सांगितले की 2021-22, 2022-23 आणि 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) सरासरी मासिक ग्रॉस GST कलेक्शन अनुक्रमे 1.10 लाख कोटी रुपये, 1.51 लाख कोटी रुपये आणि 1.69 लाख कोटी रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या