JOIN US
मराठी बातम्या / मनी / 5G Launching Updates: सर्वसामान्य लोकांना कधी मिळणार 5G सुविधा?

5G Launching Updates: सर्वसामान्य लोकांना कधी मिळणार 5G सुविधा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G सेवा सुरू करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही माहिती दिली आहे.

जाहिरात

5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील?वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G सेवा सुरू करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही माहिती दिली आहे. राजधानीच्या द्वारका सेक्टर 25 मधील आगामी दिल्ली मेट्रो स्टेशनच्या भूमिगत बोगद्यातून पंतप्रधानांना 5G सेवांचे कार्य दाखवले जाईल. 5G तंत्रज्ञानाच्या मदतीने हायस्पीड इंटरनेट कोणत्याही व्यत्ययाशिवाय वापरता येऊ शकते. तंत्रज्ञानाच्या जगात ही एक क्रांती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या IICC कॅम्पसमध्ये बोगद्याचा एक भाग निवडण्यात आला आहे, जिथे पंतप्रधानांना बोगद्याच्या आत असलेल्या 5G नेटवर्कचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. बोगद्याच्या आत असलेल्या 5G सेटअपमध्ये दूरसंचार उपकरणे, कॅमेरे, ऑप्टिकल फायबर केबल्स असणार आहेत. दिल्ली मेट्रोने 5G प्रात्यक्षिकासाठी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. कर्मशियलसाठी ही 5G सेवा सुरू झाली तरी ती सामान्य लोकांपर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न आहे. ही सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून १ वर्षांपर्यंत कालावधी जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एक तृतीयांश मोबाईल कनेक्शन 5G वापरणारे असणार आहेत. या सेवेमुळे 5G मोबाईल खरेदी करण्याकडे तरुणांचा कल अधिक असल्याचं दिसत आहे. न्यूज १८ लोकमतवर तुम्हाला हा उद्घाटनाचा सुवर्णक्षण पाहता येणार आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 5G नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक खूप मोठा फायदा मिळवून देऊ शकते. परिवर्तन घडवून आणू शकते. स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवनिर्मितीला चालना देण्यासाठी तसेच ‘डिजिटल इंडिया’ची दृष्टी पुढे नेण्यास मदत करेल. भारतावर 5G चा आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या