JOIN US
मराठी बातम्या / मनी / एकच नंबर! ‘या’ क्रेडिट कार्डवर मिळतोय 3 लाखांचा फ्री लाइफ इन्शुरन्स, असा करा ऑनलाइन अर्ज

एकच नंबर! ‘या’ क्रेडिट कार्डवर मिळतोय 3 लाखांचा फ्री लाइफ इन्शुरन्स, असा करा ऑनलाइन अर्ज

Federal Bank Credit Card: क्रेडिट कार्डवर क्रेडिट मर्यादेइतकेच विमा संरक्षण मिळते. या कार्डची क्रेडिट मर्यादा कमाल 3 लाख रुपये आहे. त्यानुसार कार्डधारकांना तीन लाख रुपयांचा जीवन विमा मोफत मिळत आहे. जीवन विम्याची मुदत 1 वर्ष आहे.

जाहिरात

‘या’ क्रेडिट कार्डवर मिळतोय 3 लाखांचा फ्री लाइफ इन्शुरन्स, असा करा ऑनलाइन अर्ज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 नोव्हेंबर: फेडरल बँकेनं ग्राहकांसाठी नवीन प्रकारचं क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. ग्रुप क्रेडिट शील्ड असे या कार्डचे नाव असून यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा एकाच वेळी उपलब्ध आहेत. सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मोफत जीवन विमा. हे क्रेडिट कार्ड घेणाऱ्या व्यक्तीला 3 लाख रुपयांचं मोफत जीवन विमा संरक्षण मिळेल. म्हणजेच कार्डधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला कव्हर म्हणून 3 लाख रुपये मिळतील. आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या कार्डवर ग्राहकाला 3 लाख रुपयांपर्यंतची क्रेडिट लिमिट मिळत आहे. फेडरल बँकेनं या क्रेडिट कार्डसाठी एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्सशी करार केला आहे. फेडरल बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ग्रुप क्रेडिट शील्ड क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना विशेष कव्हर ऑफर करते. यामध्ये क्रेडिट मर्यादेएवढेच विमा संरक्षण उपलब्ध आहे. या कार्डची क्रेडिट मर्यादा कमाल 3 लाख रुपये आहे. त्यानुसार कार्डधारकांना तीन लाख रुपयांचा जीवन विमा मोफत मिळत आहे. जीवन विम्याची मुदत 1 वर्ष आहे. हेही वाचा:  Bank Loan: वाटोळं! या तीन बँकांचं कर्ज झालं महाग, EMI आणि व्याजदरही वाढला, ग्राहकांना फटका क्रेडिट कार्ड वैशिष्ट्ये-

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या