JOIN US
मराठी बातम्या / मनी / कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता

कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्छा ढासळत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार 25 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात

LIN घेण्यासाठी तुम्ही https://shramsuvidha.gov.in या वेबसाइटची मदत घेऊ शकता. नवीन कर्मचाऱ्याकडे आधारशी जोडला गेलेला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) असणं फार आवश्यक आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्छा ढासळत आहे. COVID 19 चा प्रादुर्भाव कसा रोखायचा या चिंतेत सर्वजण असतानाच आणखी एक चिंतेची बाब समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका एजन्सीच्या अहवालानुसार जगभरातील 25 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या कोरोनामुळे धोक्यात आल्या आहेत. प्रत्येक देशांच्या सरकारने योग्य पॉलिसी नाही राबवली तर संपूर्ण जगात बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. (हे वाचा- कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका ) कोरोना व्हायरसचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वांनाच बसला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work From Home करण्याचा सल्ला दिला आहे, पण काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवले आहे.  तर काही कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात येणार आहे. बेरोजगारीबाबत ILO चा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संस्था (International Labour Organisation- ILO) ने सुद्धा इशारा दिला आहे की, जगभरामध्ये आर्थिक संकट येऊ शकतं आणि त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ILO च्या म्हणण्यानुसार कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी काही विशिष्ट पावलं उचलावी लागणार आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा, कामाची वेळ कमी करणे तसंच पेड लिव्ह या गोष्टींचा समावेश आहे. (हे वाचा- कोरोनासाठी देशातील पहिली इन्शुरन्स योजना लाँच, 499 रुपयात होणार उपचार ) ILO ने असा प्रस्ताव देखील मांडला आहे की, काही सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देखील मिळणं गरजेचं आहे. या संस्थेच्या माहितीनुसार 2008-09 मध्ये ज्याप्रमाणे जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी पावलं उचलण्यात आली होती, त्याप्रमाणे काम केल्यास हे संकट टळू शकते. ILO च्या अहवालानुसार कोरोनाचा परिणाम बेरोजगारीवर होत आहे आणि मोठ्या प्रमाणात या बेरोजगारीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामाचे तास आणि पगारामध्ये कपात झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या