चंद्रकांत पाटील
बारामती, 13 डिसेंबर : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर दोन दिवसांपूर्वी पिपंरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली होती. यावरून भाजप चांगलेच आक्रमक झाले. शाईफेकीची ही घटना ताजी असतानाच आता बारामतीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. बारामतीमधील भाजप कार्यालयाच्या फलकावर तरुणाकडून शाईफेक करण्यात आली आहे. सचिन जगताप असं शाईफेक करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी भाजप कार्यालयाच्या फलकावर शाई फेकणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून चौकशी आज बारामतीमधील भाजप कार्यालयाच्या बोर्डवर सचिन जगताप या तरुणाने शाईफेकली. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मात्र त्याने भाजप कार्यालयाच्या बोर्डवर शाई का फेकली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून, चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. हेही वाचा : Winter session : शिंदे सरकारसाठी ‘हे’ पाच मुद्दे ठरणार डोकेदुखी? पुणे बंद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांकडून पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. आज पुण्यात विरोधीपक्षाचे जवळपास सर्वच नेते एकवटले आहेत. मूक मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यातून हटवलं जाव, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. हेही वाचा : शरद पवार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसात तक्रार दाखल संजय राऊत यांची टीका दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांचे बॉस केंद्रीय गृहमंत्रालय आहे, म्हणून त्यांनी अमित शाह यांच्याकडे खुलासा केला. राज्यपालांवरील कारवाईबाबत अमित शाह यांना पत्र पाठवलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.