JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवार-राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद; प्रकरणात लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा?

शरद पवार-राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद; प्रकरणात लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या (Babasaheb Puranadare) लिखाणावरुनही सध्या मोठा वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुरंदरे घरघरात छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली, असा आरोप केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या (Babasaheb Puranadare) लिखाणावरुनही सध्या मोठा वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुरंदरे घरघरात छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली, असा आरोप केला आहे. यामुळे आता स्वत: लेख जेम्स लेनने या विषयावर खुलासा केला आहे. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली. जेम्स लेन काय म्हणाले? जेम्स लेन यांनी 16 एप्रिलला इंडिया टुडे मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, 2003 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात, त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात, याबद्दल होतं. जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही”. तसेच माझी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत कधीच चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळ स्पष्ट केलं. “छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे”. हेही वाचा -  कोण आहेत पाकिस्तानी बिलकिस बानो इदी? ज्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? “या देशामध्ये हजारो वर्षांपासून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेश निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकवली गेली. इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे. शरद पवार सांगतात म्हणे इतिहास चुकीचा सांगितला गेला. राष्ट्रवादीने संभाजी बिग्रेड, सीग्रेड सारख्या अनेक संघटना काढल्या. या संघटना 1999 सालानंतर कशा आल्या? योगायोग? योगायोग नाही, यांनीच काढल्या”, असा घणाघात राज ठाकरेंनी केला. “मी पुण्याला शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती. तेव्हा याबाबत प्रश्न विचारला होता. मी त्यांचं वय बघून त्याबाबत जास्त खोलावर गेलो नाही. पण शरद पवार राष्ट्रवादीच्या जन्मापासून ज्या-ज्यावेळेला भाषण करतात तेव्हा महाराष्ट्र कुणाचा तर शाहू-फुले-आंबेडकरांचा असं म्हणतात. मान्यच आहे. पण त्याअगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. पण शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना दिसत नाहीत”, असं दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. शरद पवारांचे प्रत्युत्तर -  शरद पवार म्हणाले, एखादी व्यक्ती वर्ष, सहा महिन्यात एखाद्यावेळी काही तरी बोलते. तेव्हा त्यांना फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते. ते म्हणाले की मी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत नाही. परवाच माझे छत्रपती महाराजांवर मी अर्धातास भाषण केले. असं आहे की, पहिल्यांदा एखाद-दुसरी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यात एखादे स्टेटमेंट करते त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. दोन -तीन विषय माझ्या वाचणात आले. शिवाजी महाराजांचं नाव मी घेत नाही असा उल्लेख त्यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. अमरावतीचं तुम्ही माझं भाषण मागवलं तर त्याच्यात शिवाजी महाराजांचं योगदान यावर माझं कमीत कमी 25 मिनिटांचं भाषण आहे. अनेक गोष्टी मी त्यात बोललो. ‘जेम्स लेननं (jems len) जिजामातांबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिले होते. त्यांचं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी (babasaheb purandare) सोलापूरच्या सभेत केलं होतं. एवढंच नाहीतर शिवजयंती तारखेनुसार करावी की तिथीनुसार याबद्दल माफी मागितली होती’ असं पुराव्यानिशी वाचून दाखवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांचे कान उपटले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या