JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भर रस्त्यात लाथा-बुक्याने महिलांना बेदम मारहाण, बारामतीतला VIDEO व्हायरल, अजूनही एकाला अटक नाही!

भर रस्त्यात लाथा-बुक्याने महिलांना बेदम मारहाण, बारामतीतला VIDEO व्हायरल, अजूनही एकाला अटक नाही!

तक्रार का दिली याचा राग मनात धरून मंगळवारी सायंकाळी या लोकांनी महिलांना बेदम मारहाण केली.

जाहिरात

तक्रार का दिली याचा राग मनात धरून मंगळवारी सायंकाळी या लोकांनी महिलांना बेदम मारहाण केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 11 ऑगस्ट : बारामतीमध्ये  (baramati) महिलांला बेदम मारहाण ( Women brutally beaten) करण्यात आल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. शहरातील खंडोबा नगर परिसरात एका महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खंडोबा नगर परिसरात ही घटना घडली आहे. वराह पालनावरून परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत होता. यासंदर्भात नगर परिषदेमध्ये आणि पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. तक्रार दिल्याचा राग मनात धरून डुक्कर पाळणाऱ्या लोकांनी महिलेवरच हल्ला चढवला. या परिसरात राहणाऱ्या काही लोकांचा डुक्कर पाळण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात डुक्करांमुळे दुर्गंधी पसरत होती. वारंवार सांगूनही स्वच्छता काही राखली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनला आणि नगर परिषदेमध्ये तक्रारी अर्ज दाखल केला होता.

तक्रार का दिली याचा राग मनात धरून मंगळवारी सायंकाळी या लोकांनी महिलांना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Raju shrivastav Health Update: शस्त्रक्रियेनंतरही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर ) या संदर्भात शहर पोलीस स्टेशनला पोस्को विनयभंग दरोडा या स्वरूपाचे 9 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मारहाण करणाऱ्या एकालाही अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. महिलांना मारहाण करणाऱ्या नराधमांना अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या