JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी हवेच कशाला? त्यापेक्षा..., सुषमा अंधारेंचा सणसणीत टोला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी हवेच कशाला? त्यापेक्षा..., सुषमा अंधारेंचा सणसणीत टोला

‘5 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. जर तुम्ही प्रकल्प गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे’

जाहिरात

'5 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. जर तुम्ही प्रकल्प गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर : राज्यातील एकापाठोपाठ 5 प्रकल्प गुजरात आणि हैदराबादला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. जर सगळेच उद्योग गुजरातला जात असतील तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे, त्यामुळे महाराष्ट्राकडे व्यवस्थितीत लक्ष तरी दिले जाईल, असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर आणखी 4 प्रकल्प राज्याबाहेर गेले. याच मुद्यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे सरकारच्या काळात ५ मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. जर तुम्ही प्रकल्प गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे. त्यामुळे ते राज्याकडे लक्ष तरी देतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे. कोकणातील सिंधुदुर्ग गोव्याला जोडण्याचा डाव भाजपने आखला आहे, असा आरोप अंधारे यांनी केला. ( राणा-कडू वाद अखेर मिटला? वर्षावरील चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी दिली प्रतिक्रिया ) मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाची एकच चौकट आहे. फक्त नवरात्राीच्या, गणेशोत्सवाच्या आरत्या करणे आणि पितृपक्षात जेवणे करणे एवढीच काम दोघांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कशाला हवे आहे, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. ( भाजप म्हणजे कॉफीवरील फेस तर RSS.. प्रशांत किशोर यांचा थेट संघावर हल्ला, म्हणाले गोडसे.. ) टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. हा सातवा प्रकल्प आहे. जो राज्यातून गेला आहे. सगळं काही ठरवून महाराष्ट्राचं अर्थकारण खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील तरुण बेरोजगार करण्याचे षडयंत्र आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस काहीही करत नाही, अशी टीकाही अंधारे यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या