JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गोधडीत राहा हा शब्द...,आदित्य ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले...

गोधडीत राहा हा शब्द...,आदित्य ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले...

‘शिंदे गटाचे मंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही.

जाहिरात

'शिंदे गटाचे मंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 07 सप्टेंबर : ‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला, शिवसेना का फोडली हे विचारायचं नाही का? 50 खोक्याचे काय झाले हे विचारू नये का? असा सवाल करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांना टोला लगावला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज गणपती दर्शनासाठी नवीमुंबई ,पनवेल मध्ये भेट दिली. यावेळी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला. ‘शिंदे गटाचे मंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहे. एकच प्रश्न आहे, 32 वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला, शिवसेना का फोडली हे विचारायचं नाही का, चांगला माणूस मुख्यमंत्री झाला होता, त्याला पायउतार का करायला लावले हे आम्ही विचारायचं नाही का,  50 खोक्याचे काय झाले हे विचारू नये का, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. (राज ठाकरेंचं अचूक टायमिंग, भाजप-सेनेच्या स्नेहभोजनावेळीच ‘वर्षा’वर!) तानाजी सावंत हे हाफकिन दलाल आहे असे म्हणतात,त्यांना माहीतच नाही हाफकिन कोण आहे आणि आता हे असे लोक एकत्र येत आहे. मनसे,भाजप, शिंदे गट कुणीही एकत्र येऊ दे जिंकणार शिवसेनेचा आहे, असंही आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. ‘मुंबई महानगर पालिकेत इतका हस्तक्षेप कुणीच कधी केला नाही. पालिकेतील अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या जातात, हे बदली सरकार आहे. बंगले घेतले, जबाबदारी कोण घेणार, पालकमंत्री अजून मिळाले नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. ‘त्यांनी कितीही आरोप केले तरी मी त्यांना उत्तर देत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला. ‘एक महत्त्वाचं आहे याचिका ही आमच्याकडून आहे. हा निकाल देशातील सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असणार आहे. राज्य घटनेवर आमचा विश्वास आहे, त्यानुसार निकाल आला तर नक्कीच शिवसेनेचा विजय होईल, असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या