JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंधेरी पोटनिवडणूक : काय असणार ठाकरे गटाचा प्लान बी, या आहेत दोन्ही गटाच्या शक्यता

अंधेरी पोटनिवडणूक : काय असणार ठाकरे गटाचा प्लान बी, या आहेत दोन्ही गटाच्या शक्यता

उद्धव ठाकरे यांच्या गटासमोर दोन पर्याय आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत बाग, प्रतिनिधी मुंबई 12 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे आता दोन गट झाले आहेत. म्हणून या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही BMC प्रशासनानं स्वीकारला नाही. यामुळे उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. जर त्यांचा राजीमाना मंजूर झाला नाही तर उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी काय असू शकतो, याबाबत जाणून घ्या. अंधेरी पोटनिवडणुकीत काय असू शकतो,उद्धव सेनेचा प्लॅन B तांत्रिक कारणावरून जर ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा,मंजूर झाला नाही तर? तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची रणनीती काय असू शकते? तर उद्धव ठाकरे यांच्या गटासमोर दोन पर्याय आहेत. 1. हायकोर्टात दाद मागायची (अर्थात ऋतुजा लटके यांचा रोल महत्वाचा) 2. नवीन उमेदवार द्यायचा (त्यासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचं नाव चर्चेत आहे) काय असू शकतो, बाळासाहेबांची शिवसेनेचा प्लॅन B 1. ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज पूर्वलक्षीप्रभावानं मंजूर झाला तर त्यांची सहमती असू शकते, असा अर्थ लावला जातोय. मग त्या असू शकतात उमेदवार. 2. जर त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर ही जागा, युती म्हणून भाजपचा उमेदवार निश्चित होऊ शकतो. 3. असं झालं तर भाजपचे मुरजी पटेल हे युतीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज, मोठं शक्तिप्रदर्शन करून दाखल करतील. हेही वाचा -  ऋतुजा लटके राजीनामा प्रकरणात अनिल परबांचा मोठा खुलासा जर असं झालं तर अंधेरी पोटनिवडणुक ही - मुरजी पटेल (महायुती उमेदवार) Vs विश्वनाथ महाडेश्वर (मविआ उमेदवार) या दोघांमध्ये होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या