JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आधी यूपी-बिहारच्या लोकांना मारून काय साध्य केलं? अजितदादांचा राज ठाकरेंना थेट सवाल

आधी यूपी-बिहारच्या लोकांना मारून काय साध्य केलं? अजितदादांचा राज ठाकरेंना थेट सवाल

‘कधी सांगतात टोल बंद करा. कधी सांगतात यूपी बिहार लोकांना हाकला. कसली नौटंकी सुरू आहे. आता मशिदीवर भोंग्याचा मुद्या काढला

जाहिरात

'कधी सांगतात टोल बंद करा. कधी सांगतात यूपी बिहार लोकांना हाकला. कसली नौटंकी सुरू आहे. आता मशिदीवर भोंग्याचा मुद्या काढला

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 08 मे : ‘आता हे अयोध्येला चालले आहे. पण यांनी आधी यूपी-बिहारच्या लोकांना मारून काय साध्य केलं. भोंगे या अगोदर दिसले नाहीत का? यांच्या या भूमिकेने साई मंदिरातील काकड आरती बंद झाली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्यावर निशाणा साधला. साताऱ्यातील वाढे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत.. यावेळी  अजित पवारांनी चौफेर फटकेबाजी केली. ‘कधी सांगतात टोल बंद करा. कधी सांगतात यूपी बिहार लोकांना हाकला. कसली नौटंकी सुरू आहे. आता मशिदीवर भोंग्याचा मुद्या काढला. आता हे अयोध्येला चालले आहे. पण यांनी आधी यूपी-बिहारच्या लोकांना मारून काय साध्य केलं. भोंगे या अगोदर दिसले नाहीत का? यांच्या या भूमिकेने साई मंदिरातील काकड आरती बंद झाली, अशी टीकाही अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली. काहींनी सांगितलं मुख्यमत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायची आहे.. काय नडलं आहे. तुझ्या घरासमोर म्हण ना. उद्धव ठाकरे यांच्या नावावर ते निवडूण आले आणि आता त्यांच्या घरासमोर ड्रामा करताय, असं म्हणत अजित पवारांनी राणा दाम्पत्यांना सणसणीत टोला लगावला. ( मोठी बातमी! NEET PG परीक्षेसंदर्भातील ‘ते’ परिपत्रक Fake; या तारखेला होणार Exam ) ‘महाराष्ट्रातील वातावरन बिघडले तर मोठे गुंतवणूकदार उद्योगपती जातील. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. पण यावर कोण बोलत नाही. सर्व चॅनलवर कोण कुठ गेले. सरकार ज्यांनी निवडून आणले त्यांना कुणी विचारत नाही, असंही अजितदादा म्हणाले. ’ खासदाराचे एकाला तिकिट दिले ( उदयनराजे भोसले खासदार असताना ) आणि मी बाळासाहेबांना डोळा मारला आणि ते उभारले आणि निवडून आले. मागे विधानसभेत माझ्या विरोधातही एक पठ्या आणला होता. पण, बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त करून घरी पाठवले, असं म्हणत अजितदादांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. ( मोक्याच्या सामन्याआधी Delhi Capitals ला मोठा धक्का! महत्वाचा खेळाडू रुग्णालयात ) ‘शरद पवारांना या धंद्या विषयी माहिती आहे. पण छोटी मानसं टीका करतात. कारखाने चालवायला घ्या मग बघू तुमच्यात किती धमक आहे.  मकरंद पाटलांनी कारखाना चालवायला घेतलाय. नीट चालवा नाही तर माझ्या सारखी केस जातील, असं म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकली, टकाहींनी गमती केल्या. निवडणूक आल्या म्हणून मोळ्या टाकण्याचं काम केलं. दूध संघात चुकीची माणसं निवडूण आली तर दुधाला दर कमी मिळतो. राज्यात काही लोकं जाणीवपूर्वक जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत. पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे ही लोक उगवतात, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. ( भरधाव दुचाकीने दाम्पत्याला दिली जोराची धडक, महिलेचा मृत्यू, घटनेचा LIVE VIDEO ) ओबीसी आरक्षण वरुन पवार साहेबांना बदनाम केलं जातं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे मानस पूत्र म्हणून पवार साहेबांकडे पाहिलं जातं. कोरोना कमी झालाय पण  संपलेला नाही. चित्रफित पाहिली खूप चांगलं काम झालंय. हे लोक सहभागाशिवाय शक्य होत नाही. किसनवीर कारखान्याची निवडणुक मकरंद पाटील यांनी जिंकली. अजिंक्यतारा कारखान्याचे मे एंड पर्यंत गाळप होईल खात्री नाही. किसनवीर कारखान्यावर किती कर्ज आहे याची बैठक घेणार आहे, असंही अजितदादा म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या