जुन्नर 13 मार्च : राज्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर यात्रा-जत्रा, सण, उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने या व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना फटका बसलाय. याचा तमाशाच्या सुपारीवरही मोठा परिणाम झाला असून फडमालक यामुळे धास्तावले आहेत. ऐन हंगाम सुरू होण्याच्या काळात तमाशा पंढरीत यामुळे बारी ठरवण्यासाठी येणारे गावपुढारी फिरकेना झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरी असलेल्या नारायणगाव येथील तमाशापंढरीवर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. गर्दी आणि कार्यक्रम टाळण्याची सल्ला सरकारने दिल्याने यात्रा, जत्रा बंद आहेत. याच जत्रांमध्ये तमाशाचा फडही रंगत असतो. या भागात त्याची लाखांचो उलाढाल होते. काही शे लोकांची उपजिविका त्यावर अवलंबून असते. आता तेच जर बंद झालं तर करायचं काय असा प्रश्न फड मालक आणि कलावंतांना पडला आहे. असं झालं तर आता तुम्हीच सांगा पाव्हणं आम्ही जगायचं कसं? असा त्यांचा सवाल आहे. ऐन हंगाम सुरू होण्याच्या काळात तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावात(ता.जुन्नर) यामुळे बारी ठरवण्यासाठी येणारे गावपुढारी फिरकेना झाले आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरी असलेल्या नारायणगाव येथील तमाशापंढरीत यंदा 45 फडमालकांनी आपल्या राहुट्या थाटल्या आहेत.पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात यात्रा उत्सव सुरू होतात त्या आधी दरवर्षी साधारण 1500 सुपाऱ्या बुक होतात.यामधून सुमारे 10 ते 12 कोटींची उलाढाल या ठिकाणी होत असते यंदा मात्र कोरोनाचा सावटामुळे यात्रा जत्रा होणार नसल्याने जेमतेम 300 सुपाऱ्या बुक झाल्या आहेत अशी माहिती तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव यांनी News 18 लोकमत ला दिली.ते पुढे म्हणाले की, बुक झालेल्या सुपाऱ्या पण यात्रा होणार नसल्याने रद्द होत आहेत त्यामुळे तमाशा फडमालक अडचणीत सापडले आहेत. एका तमाशा फडात बिगारी,कामगार, कलावंत यासह किमान 75 ते कमाल 150 जण असतात त्यांचे करार होऊन आधीच उचल दिली आहे. आता जर यात्रा रद्द झाल्या तर घेतलेलं कर्ज कसं फेडायचे आणि हंगाम तोट्यात जाणार अशी भीती सर्व फडमलकाना आहे. रामनवमी निमित्त खोडद येथील यात्रेत तमाशा ठरवलेले ग्रामस्थ मनाजी घंगाळे आणि मांजरवाडी चे ग्रामस्थ नारायण मुळे यांनी मात्र पाडव्या पर्यंत कोरोना इफेक्ट् कमी होऊन यात्रा जत्रा पूर्ववत होतील अशी आशा आमच्याशी बोलताना व्यक्त केली. अमेरिकेने सोडला चीनमध्ये कोरोना, नव्या आरोपामुळे जगभरात खळबळ गुढी उभारून या फडमालकानी यात्रेकरूंचे स्वागतही केले आणि आपल्या नव्या वर्षाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. गावच्या जत्रेत करमणूकीसाठी रात्रीच्या वेळी तमाशा ठेवण्याची परंपरा असून गावपुढारी या ठिकाणी येवून त्याचं बुकिंग करतात. याला सुपारी देणं असंही म्हणतात. मागील ८० वर्षांपासूनची ही परंपरा असल्याचं सांगितलं जाते. मात्र आता कोरोनामुळे हे सगळंच बंद होण्याची शक्यता आहे. हे वाचा… ‘शिवज्योत’शिवनेरीवरून आणताना अपघात, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू