JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियम पायदळी; उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियम पायदळी; उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

अमरावतीमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, असे असताना स्वत: आमदार रवी राणा यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 3 जुलै : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात ही विदर्भातील अमरावती (Amravati) जिल्ह्यातून झाल्याचं पहायला मिळालं होतं. आता कुठे दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या विषाणूने (Delta Plus Variant of Coronavirus) चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अनेक जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) मध्ये चक्क आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याकडूनच नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा हे अनेकदा कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेले नियम पायदळी तुडवतांना दिसून आले आहेत. आज पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आमदार राणा यांनी अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील भुयारी मार्गाचे चे उद्घाटन केले.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, 386 मुले कोरोनाबाधित हा भुयारी मार्ग आजपासून सामान्य जनतेसाठी खुला केला. मात्र यावेळी रवी राणा यांनी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवली होती. एकीकडे जिल्ह्यात कोरोना नियमांच पालन करण्यासाठी प्रशासन वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावत असताना लोकप्रतिनिधींकडूनच कोरोना नियमांच पालन होत नसेल तर सामान्य जनता काय करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई होणार? आमदार रवी राणा यांनी केलेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी स्वत: चेहऱ्यावर मास्क लावलेला नसल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. आता आमदार रवी राणा यांनीच नियम पायदळी तुडवल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या