JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरात भाजपविरुद्ध भाजप! इचलकरंजीला पाणी देण्यावरून 4 तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कोल्हापुरात भाजपविरुद्ध भाजप! इचलकरंजीला पाणी देण्यावरून 4 तालुक्यातील शेतकरी आक्रमक

ऐन पावसाळ्यात पाण्यावरून कोल्हापुरात संघर्ष पेटला आहे. दुधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणी देण्यावरून चार तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 14 जुलै: ऐन पावसाळ्यात पाण्यावरून कोल्हापुरात संघर्ष पेटला आहे. दुधगंगा नदीमधून इचलकरंजी शहराला पाणी देण्यावरून चार तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. दुधगंगा नदीच्या पुलावरच शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कागल तालुक्यातील बिद्री-कोल्हापूर रस्ता बंद करण्यात आला आहे. हेही वाचा… कोरोनाच्या संकटात मुंबईतील डबेवाल्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय यावरून पडली वादाची ठिणगी.. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरासाठी नव्याने प्रस्तावित केलेली सुळकुड पाणी योजनेवरून वाद निर्माण झाला आहे. या वादात भाजपविरुद्ध भाजप असं चित्र निर्माण झालं आहे. इचलकरंजी नगरपालिकेत भाजपची सत्ता असतानाही भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या नेतृत्त्वाखाली या योजनेला विरोध केला जात आहे. कागल, करवीर आणि शिरोळ तालुक्यातील लोकांना दुधगंगा नदीच पाणी पूरणार नाही, तर मग आम्ही इचलकरंजी शहराला पाणी का द्यावं, असा सवाल उपस्थित केला जात आहे, सुळकुडच्या सरपंच ज्योती पोवाडे यांनी उपस्थित केला आहे. मात्र, दुधगंगा धरणात उपयुक्त पाणी साठ्यावर इचलकरंजी शहरातील नागरिकांनी दावा केला आहे.

संबंधित बातम्या

नेमकी काय आहे ही योजना… - दुधगंगा धरणात उपयुक्त पाणी साठा 23.99 टीएमसी आहे.. -त्या मधील 5.95 टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे.. -यातील 3.710 टी एम सी पाण्याचं आधीच वाटप झालंय.. - भविष्यात 0.904 पाण्याची मागणी अपेक्षित आहे. -हे जर आकडेवारी पाहिल्यास दुधगंगा नदीमध्ये 1.14 टीएमसी पाणी शिल्लक आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या