JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : 10 वी, 12 वी पाससाठी गोल्डन चान्स, 2000 पदांवर होणार महाभरती!

Video : 10 वी, 12 वी पाससाठी गोल्डन चान्स, 2000 पदांवर होणार महाभरती!

दोन हजार पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात मोठ्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 18 ऑक्टोबर : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन वर्धा येथे करण्यात आले आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता न्यू आर्ट, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हा मेळावा होणार आहे. या माध्यमातून तब्बल दोन हजार पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात मोठ्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. या कंपन्यांचा समावेश रोजगार मेळाव्यात 2 हजार पेक्षा जास्त जागांवर भरती होणार आहे. धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड, नवभारत फर्टिलायझर्स, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, पाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन लाइफ इन्शुरन्स, नूरजहाँ मँगो प्लांट नर्सरी, स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि., गेमटेक्‍स टेक्सटाईल, हिंगपाघाट आणि वाणी, तालेनसेतु सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, पटले स्किल फाउंडेशन, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, जेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मेळाव्यासाठी येणार आहेत.     Photos : दुर्गंधीच्या ठिकाणी शाळेनं फुलवली बाग, पोषण आहारातही होतो भाज्यांचा उपयोग दहावी, बारावीवरही मिळणार नोकरी शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत. रोजगारासोबतच युवकांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचसोबत शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी, पदवी, आयटीआय इत्यादी शैक्षणिक पात्रता असलेल्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन कॉन्फरन्समध्येही सहभागी होऊ शकता. त्यासाठी महास्वयम् वेबसाईट देण्यात आली आहे. Video : दिवाळीपूर्वी तेल विक्रेत्यांना चाप, अन्न आणि औषध प्रशासन ॲक्शन मोडवर! जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इंद्रप्रस्थ न्यू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  महास्वयम पोर्टलवर 19 ऑक्टोबरपर्यंत ही ऑनलाइन रोजगार परिषद उपलब्ध असणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक तरुणांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या