JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha : कचरा कुजेपर्यंत सफाईच होत नाही!, शहरात पसरलं घाणीचं साम्राज्य, Video

Wardha : कचरा कुजेपर्यंत सफाईच होत नाही!, शहरात पसरलं घाणीचं साम्राज्य, Video

कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 3 नोव्हेंबर : शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.  वर्धा  शहरातील विविध भागामध्ये कचऱ्याचे  ढीग लागल्याचे दिसत आहेत. कचऱ्यामुळे रस्त्यावर बेकायदा डम्पिंग यार्ड बनले आहे. शहरात ठिकठिकाणी घाण पसरली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची दुरवस्था होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील समता नगर परिसर, भाजी मार्केट, राम नगर या भागत स्वच्छतेचा प्रश्न मोठा गंभीर होत आहे. नगर परिषदेने कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या कंपनीचे कंत्राट संपले. त्यात वाढ करण्यात आली आहे. मात्र कंत्राटदार कमी सफाई कर्मचाऱ्यांसह कामे करून घेत आहे. कंपनीचे दुर्लक्षामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.   Video: थंडीत अंग ठणकतयं? त्रास कमी होण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर प्रशासनाचं दुर्लक्ष लक्ष्मीनगरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. लक्ष्मीनगरच्या चौकाचौकात लोक कचरा टाकतात. कचरा वेळीच उचलला जात नाही. परिणामी तो कुजतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. स्वच्छता केली जाईल नगर परिषद अधिकारी राजेश भगत यांना घाणीबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले आहे की, आम्ही या विषयावर मिटींग घेऊन लवकरच तोडगा काढणार आहोत. सफाई कर्मचाऱ्यांना शहरातील सर्व परिसर स्वच्छ करण्यासंदर्भात सांगण्यात आलेले आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या