Robbery CCTV: ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, दुकान मालकाच्या धाडसाने बारबालेचा प्रयत्न फसला
विरार, 25 मे : एका बारबालेने बनावट बंदुकीच्या आधारे विरार **(Virar)**मधील एक ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न (attempt of robbery in jewelry shop) केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, सराफाने प्रसंगावधान दाखवून या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी (Global City Virar west) येथे देवनारायण हे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळावारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बुरखाधारी महिला या दुकानात खरेदीसाठी आली होती. त्यावेळी देवलाल गुजर हे दुकानात एकटे होते. दोन तास ती महिला लग्नासाठी दागिने बघत होती. दुपारी अचाकन एकच्या सुमारास तिने लपवून आणलेली बंदूक काढली आणि त्याला धमकावत दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी केली. यावेळी ज्वेलरी शॉप मालक देवलाल गुजर यांनी प्रसंगावधान दाखवत या महिलेला पकडले. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. फसलेल्या लुटीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
ही महिला बारबाला असून मिरारोड येथील एका बारमध्ये काम करते. तिच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने आणलेली नकली बंदूक सिगारेट लायटर होती. तिची पार्श्वभूमी आम्ही तपासत आहोत, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. पुण्यात सराफ व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर येथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या आरोपीने सराफा व्यापाऱ्यांवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. हल्लेखोर दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. बराच वेळ ते आतमध्ये बसलेला होता. दुकानात कुणी येत नाही, याची संधी साधून बॅगेतून चाकू काढला आणि सराफावर हल्ला केला. सराफाने मोठ्या हिंमतीने त्याचा हल्ला परतावून लावला. त्यांनी या चोराच्या हातातून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. सराफ व्यापा-याने जोरदार प्रतिकार केल्यामुळे चोरटा चांगलाच घाबरला आणि त्याने दुकानातून धूम ठोकली. पण याा झटापटीत सराफ व्यापाऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.