JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं, पण निर्णय...', विधानसभा अध्यक्षांनी त्या 16 आमदारांचं भवितव्य सांगितलं!

'सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं, पण निर्णय...', विधानसभा अध्यक्षांनी त्या 16 आमदारांचं भवितव्य सांगितलं!

आमदारांच निलंबन करायचे की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंधुदुर्ग, 6 नोव्हेंबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मध्यावधी निवडणूक का लागणार याबद्दल खुलासा केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ मोठ्या घोषणा करत असतो. कालपर्यंत गुजरातच्या निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रातील जमीनवर काही प्रकल्प ठरले होते. जे प्रकल्प येणार होते, पण हे प्रकल्प महाराष्ट्रातून ओरबाडून नेण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांना महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलं आहे. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रांकडे दिले आहे. या घोषणांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकता, असा माझा अंदाज आहे, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. यावरुन आता विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना टोला लगावला आहे. काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर - आमदारांच निलंबन करायचे की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्ट त्याबद्दल निकाल देवू शकते. मात्र, निलंबन करायचे की नाही हा निर्णय अध्यक्षांचा आहे. तर सरकार स्थापन करणे की पाडणे हे विधानसभा ठरवते. त्यामुळे सरकार पडणार, असं कुणी विधानसभेच्या बाहेर बोलत असेल, चर्चा करत असेल तर त्याला मी महत्व देत नाही असा खोचक टोला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी लगावला. हेही वाचा -  महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार का नाही? अंधेरीच्या निकालानंतर ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली मला फक्त आंब्याचे खोके माहित - राज्यात खोक्याचे आरोप-प्रत्यारोप याबाबत त्यांना विचारले असता मला फक्त आंब्याचे खोके माहीत आहेत, अशी टिपण्णी केली. सावंतवाडी येथील आपल्या मुळ घरी आल्यावर पत्रकारांशी बोलत होते. मध्यावधी निवडणूक का लागणार? भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचं की नाही हे बघतोय. मध्ये माझी एक सभा आहे. आमच्याकडून काही नेते नक्की जातील. आमचे ज्येष्ठ नेते नक्की जातील, कोण जाणार हे ठरवलं जाईल, असंही ठाकरेंनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या