JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिंता वाढली! राज्यात मुंबई, पुण्यानंतर तयार होतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

चिंता वाढली! राज्यात मुंबई, पुण्यानंतर तयार होतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला पण आता राज्यातला आणखी एक जिल्हा कोरोनाचं हॉटस्पॉट बनत असल्याचं समोर येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 30 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या जरी वाढत असली तर संक्रमणाची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या महामारीने मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला पण आता राज्यातला आणखी एक जिल्हा कोरोनाचं हॉटस्पॉट बनत असल्याचं समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात कोरोना रुग्णांनी 27 हजारांचा आकडा पार केला आहे. तर मृतांचा आकडा 900 च्या पार गेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात पालिकेने विनाकारण घराबाहेर न पडण्याचा आणि लॉकडाऊनचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, भीषणता दाखवणारा VIDEO नागपुरात जिल्ह्यात काल आणखी 921 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रोज नव्याने कोरोना रुग्णांची मोठी संख्या समोर येत आहे. त्यामुळे पालिकेकडून नियमांकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी नागपूरमध्ये एकूण 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही आकडेवारी खरंतर चिंतेत टाकणारी आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 979 रुग्णांचा मृत्य झाला आहे. तर नागपूरात कोरोना रुग्णांची एकंदर संख्या 27,015 वर पोहोचली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 276 आणि शहरातले 643 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात येत आहे. BMC ने सील केली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची इमारत, नेमकं काय झालं? शनिवारी कोविड रुग्णालयातून 1112 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16,967 इतकी आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल 16 हजार 867 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 281 वर पोहोचली आहे. एका क्षणात गायब झाला भला मोठा पूल, पाहा धक्कादायक अपघाताचे भीषण PHOTOS महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे 328 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11,541 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात दरदिवशी कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच आता केंद्राच्या मदतीशिवाय राज्यांना लॉकडाऊन जाहीर करणं शक्य होणार नसल्याने कोरोनाला रोखणार तरी कसं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या