JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रामदास आठवलेंची लतादीदींना अनोखी काव्यमय श्रद्धांजली

रामदास आठवलेंची लतादीदींना अनोखी काव्यमय श्रद्धांजली

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही लतादीदींना काव्यमय श्रद्धांजली वाहिली आहे. (Lata Didi) त्यांनी ट्वीटरला एक कविता पोस्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 फेब्रुवारी: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. लतादीदींच्या निधनानंतर दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही लतादीदींना काव्यमय श्रद्धांजली वाहिली आहे. (Lata Didi) त्यांनी ट्वीटरला एक कविता पोस्ट केली आहे. रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली भारतरत्न लता मंगेशकर नाव हे राहील अजरामर मनामनात गुंजत राहिल गाणकोकिळेचे सुमधुर स्वर लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती गरिबांच्या दुःखावर मायेची फुंकर होती

त्यांच्या गायनाने सैनिकांनाही प्रेरणा लाभत होती ए मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पानी या गीतातून सदैव ऐकत राहू लतादीदींची वाणी गाणं कोकिळा स्वरसम्राज्ञी अजरामर ठरली मी वाहतो लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली! दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली! मुख्यमंत्री भावुक; लतादीदींना वाहिली श्रद्धांजली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. (Veteran singer Lata Mangeshkar dies at 92) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपलं. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहानं नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या