JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरे यांच्या धाकट्या चिरंजीवांचा आज वाढदिवस, मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची चर्चा, तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्डस यांची उपमा

उद्धव ठाकरे यांच्या धाकट्या चिरंजीवांचा आज वाढदिवस, मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची चर्चा, तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्डस यांची उपमा

तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. त्यानिमित्ताने सामना वृत्तपत्रात आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑगस्ट: शिवसेनापक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. त्यानिमित्ताने सामना वृत्तपत्रात आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. तेजस ठाकरे यांना महान स्फोटक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस यांची उपमा देत शुभेच्छा देण्यात आल्यात. जर तेजस ठाकरे यांचा स्वभाव व्हिव्हियन रिचर्डस सारखा असेल आणि त्यांना तशी उपमा देण्यात आली असेल, तर मग तेजस यांचे मोठे बंधू आणि विद्यमान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बद्दल काय मत आहे याबद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

याच संदर्भात न्यूज 18 लोकमतने थेट शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी संवाद साधला. यावर त्यांनी ज्या प्रकारे तेजस ठाकरे यांना स्फोटक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डसची उपमा दिली आहे. तसंच त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना तंत्रशुद्ध फलंदाज सुनिल गावस्करची उपमा दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या