सचिन आणि राजेश हे दोघेही चांगले मित्र होते. या दोघांचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते
अमरावती, 05 जून : एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध (love affair ) असल्यामुळे दोन मित्रांमध्ये वारंवार भांडणं होत होती. याच रागातून एका मित्राने चाकूने वार करून आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना अमरावतीमध्ये (Amravati ) उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील चांगापूर फाट्यावर ही घटना घडली. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चागापूर फाट्याजवळ धारदार चाकूने भोसकून मित्राची हत्या करण्यात आली. सचिन खरात असे मृतकाचे नाव आहे. तर त्याचा मित्र राजेश याला अटक करण्यात आली आहे. नवसारी इथं राहणारे सचिन आणि राजेश हे दोघेही चांगले मित्र होते. या दोघांचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. एकाच महिलेसोबत प्रेमसंबंध जुळल्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. अनेक वेळा दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले होते. प्रेमसंबंधामध्ये अडथळा येत असल्यामुळे राजेशने सचिनचा काटा काढण्याचे ठरवले. ( PHOTO: Jio वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रम करणारी राधिका मर्चंट आहे तरी कोण? ) आज दुपारी चागापूर फाट्याजवळ सचिन खरात आला असता राजेश याने धारदार शस्त्राने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सचिन जागेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सचिनवर वार करून आरोप राजेशने घटनास्थळावरच स्वत: वर चाकूने वार केले. स्थानिकांनी तातडीने सचिनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ( राज्यसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी, तिसरी जागा आम्हीच जिंकणार, शेलारांचा दावा ) घटनास्थळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजेशला पोलिसांनी अटक केली असून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. तर या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.