JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नियतीचा वाईट खेळ, ट्रकच्या धडकेत बापाच्या डोळ्यादेखत कुटुंब संपलं, पत्नीसह 2 मुलं जागीच ठार

नियतीचा वाईट खेळ, ट्रकच्या धडकेत बापाच्या डोळ्यादेखत कुटुंब संपलं, पत्नीसह 2 मुलं जागीच ठार

धड़क इतकी जबर होती की, त्यात दोन मुले व आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात

धड़क इतकी जबर होती की, त्यात दोन मुले व आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहाल भुरे, प्रतिनिधी गोंदिया , 05 मे  : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या आई  आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाल्याची दुखद घटना गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (National Highway No. 6) वर  घडली आहे. एकाच परिवारातील तीन लोकांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर देवरी -नागपूर मार्गावर सडक-अर्जुनी तालुक्यातील नैनपुर गावाजवळ हा अपघात घडला आहे. मृतकांमध्ये चिन्मय तुळशीराम मेश्राम (वय 6 वर्ष), प्रीती तुळशीराम मेश्राम (वय 34 वर्ष) तर एक 12 वर्षाचा मुलाचा समावेश आहे. वडील तुळशीराम रामा मेश्राम वय 45 यांच्यावर नागपtर येथे उपचार सुरू आहे. (हे ही वाचा- सरकारी शाळेतच चिमुरडीचा तडफडून मृत्यू; पाणी पिण्यासाठी गेली अन्… ) तुळशीराम मेश्राम हे आपल्या कुटुंबासह लाखांदूर तालुक्यातील धरतोडा येथून देवरीकडे जात असताना नैनपुर गावाजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धड़क इतकी जबर होती की, त्यात दोन मुले व आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये चिन्मय तुळशीराम मेश्राम, प्रीती तुळशीराम मेश्राम तर  बारा वर्षाचा  मुलाचा समावेश आहे. वडील तुळशीराम रामा मेश्राम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अज्ञात वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाले असून त्याचा शोध डूग्गीपार पोलीस घेत आहेत. ( मुंबईचा विकासात परप्रांतींयाचे सुद्धा योगदान’, मनसे नेत्याचं वक्तव्य ) तुळशीराम मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. मात्र एकाच परिवारातील तीन लोकांच्या मृत्यूमुळे मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या